आनंदी असून न्याय नीति मूर्तिमंत तेथें वास करीत होती. अशाप्रकारें राज्यकाभार चालला असतां, दौलताबादेकडील जालन्याचे मोंगल अधिकाऱ्याकडून तिकडील प्रांतांतील रयतेवर अतिशय त्रास व जुलूम होत आहे, अशी खबर समजली. यावरून त्या मोंगल अधिकाऱ्यास शिक्षाकरण्याचा निश्चय करून महाराजांनीं सरदारांस रायगडीं एकत्र होण्याविषयीं आज्ञापत्रें पाठविलीं. निवडक लोकांनिशीं जालने शहरावर स्वारी करून तेथील अधिकाऱ्याची खोड मोडून परत रायगडीं महाराजांची स्वारी दाखल झाली. यावेळीं महाराजांचे वयास त्रेपन्नावें वर्ष लागलें. ही स्वारी महाराजांची होती, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. रायगडीं परत आल्यावर महाराजांस थोडेसें थकल्यासारखें वाटून ताप आला. तो ताप पुढें ज्यास्त होत जाऊन त्यांतच महाराजांचा अंत झाला. ज्येष्ठ शुद्ध १५ रविवार शके १६०२ रौद्रनामसंवत्छरे तारीख ५ एप्रील सन १६८० रोजीं संध्याकाळीं या आर्यभूमीचा प्रतापी सूर्य अस्तास गेला. हर! हर! केवढा हा दुःखाचा प्रसंग ! त्या रायगडवासीं जनावर आकाशांतील धोंड येऊन पडली. सर्व प्रजाजन शोकसागरांत बुडून गेले! शेवटीं महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज यांस गादीवर स्थापून, महाराजांच्या
- या समयीं संभाजी महाराज त्यांच्या एकंदर वाईट वर्तनामुळें पन्हाळ्या किल्यावर नजर कैदेंत शिवाजी महाराजांनी ठेविलें होतें. संभाजीचे वर्तनावरून तो राज-
.