Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

अवरंगजेबास त्राही, त्राही, करून सोडिलें. या मोहिमींत जे, जे, मोंगलांकडील सरदार व अब्रूदारलोक सांपडले त्यासर्वांस लष्कराबरोबर आणून पुण्याजवळील चाकणचे किल्ल्यांत बंदीत टाकले. हीं कामें होत आहेत तों थोडेच दिवसांनी ती मथुरेची मंडळी आपल्या गुप्तवेषांतच रायगडीं दाखल झाली. संभाजी महाराजांस स्त्रीवेषांतच महाराजांचे हवालीं केलें. त्यावेळीं संभाजी सुरक्षित आलेला पाहून महाराजांस, जिजाबाईस व सर्व रायगडवासींजनांस जो आनंद झाला, त्याचें मी शद्वानें वर्णन करण्यास असमर्थ आहें. थोडक्यांत सांगितलें तर यमुनेंतून श्रीकृष्ण भगवान् परत आल्यावर यशोदेस व सर्व गोकुळवासीजनांस जसा आनंद झाला, तसाच आनंद रायगडावरील अबालवृद्धांस झाला. महाराजांनीं युवराज संभाजी महाराज सुरक्षित येऊन पोहोंचल्याबावद अनेक धर्मादाय केला. मथुरेचे विश्वासु ब्राह्मणांस मोठमोठे पोषाख, अलंकार भूषण आणि रोख ऐवज मिळून एकंदर ४ लक्षांचा विषय दिला. मथुरेच्या श्रीकृष्णाचे देवास ज्या देवळांत संभाजी महाराज राहिले होते, त्या देवास अलंकार भूषणें दिली. मथुरेचे ब्राह्मणांनीं महाराजांस विनंती केली कीं, "हें इतके विपुल द्रव्य आम्ही सुरक्षित घरीं नेऊं अशी आम्हांस अशा नाहीं. वाटेंतच धनाचे पायीं आमची समाप्ती होईल ! कसें करावें?" तेव्हां 'महाराजानीं त्यांस सडे रवाना करून विश्वासुमावळे