पान:रामायणनिरीक्षण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १ लें. [ ५ ] व्यासांचा पणजा वसिष्ठ हा इक्ष्वाकुकुलांतील राजांचाच बसिष्ठ - शक्ति पुरोहित होय की नव्हे, याबद्दल वाद आहे. परराशर-व्यास केले ॥ [ भारत १.१००-३५ ] मध्ये म्हटले आहे:- " वेदानधिजगे सांगान् वसिष्ठादेष वीर्यवान् || " इक्ष्वाकुकुलांतील कल्माषपाद [ सौदास ] राजाने विश्वामित्राच्या चिथावणीनें वसिष्ठाचे शक्ति आदि १०० पुत्र मारल्याविषयीं [भारत, आदिपर्व, अ. १७९ ] उल्लेख आहे; हैं पुढे शक्तीच्या पराशर- नामक पुत्रानें ऐकून सर्व राक्षसांचें सत्र करण्यासाठीं अग्नि पेटविला; या अग्नीविषयीं भारतकर्त्यांनी म्हटले आहे कीं:- स तत्राऽद्यापि रक्षांसि वृक्षानश्मन एव च ॥ भक्षयन् दृश्यते वन्हिः सदा पर्वणि पर्वणि || भारत १. १८३.२३. यावरून, वरील वसिष्ठ ( व्यासांचा पणजा ) हा इश्वा- कुकुलांतील सौदास राजाचा पुरोहित होता है कळून येईल. हा कल्माषपाद रामाचा पूर्वज आहे हें ( भागवत, ९. ९ वरून ) फळून येतें. सौदास-अश्मक-दशरथ-ऐडविड-विश्वसह-खट्टांग-दीर्घबाहु- रघु-पृथुश्रवा -अज व दशरथ - इतक्या पिढ्या कल्माषपाद व राम यांच्या मध्ये आहेत. असे असून ( ह्म. ११ + ३० = ४१ पिढ्या मध्ये असून ) भीष्म व वसिष्ठ हे समकालीन केले आहेत हे कसे ? ( ६ ) आदिपर्व, ( अ. १४१ मध्ये ) द्रोण सांगतो कीं:-- ' अगस्तीचा धनुर्वेदांत अग्निवेश्य नामक शिष्य होता, त्याचा मी शिष्य होय; तसेंच भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज- त्याचा पुत्र द्रोण हाहि