पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

S (es) इंग्रजी वर्णमालेतील एकुणिसावें अक्षर. याला इंग्रजी व्याकरणांत अपमवर्ण व्यंजन (sibiiant consonant) असें म्हणतात, व याची अनेकवचने Ss, S' अशी लिहितात. २९ च्या आकाराची वस्तु.३ 5 च्या आकाराचें वांकण N, S च्या आकाराचे वळण . उत्पत्तिः प्राचीन इजिप्शन चित्रलिपीतील शुध्वनिदर्शक THI मूळ चित्राक्षराचे रूपांतर होत होत त्याचे फिनिशन भाषेतील W हे अक्षर बनले पुढे त्याची वेस्टर्न ग्रीक भाषेतील 5 ही अक्षरें बनली व या ग्रीक अक्षरांपासून ल्याटिन व इंग्रजी भाषांतील 3 या अक्षराची उत्पत्ति झाली, असें युरोपियन वर्णविदांचे मत आहे. उच्चारः Sया अक्षराचे मुख्यतःस् आणि ज् असे दोन उच्चार आहेत. स हा उच्चार This, Sack या शब्दांत येतो; व जहा उच्चार Wise, Is या शब्दांत येतो. या दोन उच्चारांशिवायचे झ आणि, श असेहि दोन उच्चार होतात; जसें, Measure, Sure. शब्दाच्या प्रारंभी सीत्कारपूर्वक स् असा इंग्रजी S अक्षराचा उच्चार होतो. हेच अक्षर शब्दाच्या मध्ये किंवा शेवटी आल्यास त्याचा उच्चार प्रचारावर अवलंबून असतो. Isle, Debris इत्यादि शब्दांत S हे अक्षर अनुच्चारित असते; व कांहीं शब्दांत S च्या पुढे h आला म्हणजे त्याचा श असा उच्चार होतो जसे, Shall, Shaokle. S या अक्षराचा व्युत्पत्तिदृष्टया विचार केला असतां परकी भाषेतून व प्राचीन इंग्रजी भाषेतून सध्यांच्या इंग्रजी भाषेत आलेल्या शब्दांत C, 2, T, R, ही अक्षरे त्या त्या भाषेतील S च्या ठिकाणी येतात; जसे, 0. E. Is, E. Ice; O. E. Rase, E. Rase; Ger. das, E. thal; Tr. Chaise, E. Chair.