पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/942

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमावणे, नांगरणे, लागवडीस आणणें, जोपासना करणे, राबणे, दुणणे, कीर्द f - राबणी f राबणूक f- कृषि f- करणे, कीर्दीस राबणुकीस आणणे. २ to direct special attention to (कडे) विशेष लक्ष देणे. ३ ( the faculties, any art ) ( अभ्यासाने-मेहनत करून) वाढविणे, (चें) परिशीलन n-अभ्यास m. करणे. ४ गिरवणे, वळवणे, कमावणे. ५ to raise by tillage मशागत f, कमाई f. करणे. ५ पीक n- पेरा m. करणे, राबणुकीने पिकवणे, उत्पन्न करणे. ६ (च्या) बरोबर सलगी.f- स्नेह m-समागम m. इच्छिणे; as, " I loved and cultivated him accordingly." Cul'tivable, Cultivat'able a. मशागत करण्याजोगा, लागवडीस आणायाजोगा, &c. Cul'tiva'tion n. लागवड f, राबणे n, शेतकाम n, शेती f, कृषिकर्म n. २ शेतकी सुधारण्याकरिता केलेली मेहनत f, यत्न m. ३ शारीरिक, बौद्धिक व नैतिक बाबतींतील उत्कर्ष m-सुधारणा f, प्रबोधन n. ४ मशागत f, कमावणे n, सुधारणा f. ५ पीक करणे n, संवर्धन n, अभिवृद्धि f. [ THAT IS UNDER C. वाहीत, वाहोळ.] Cul'tiv'ated pa. t. & pa. p. राबलेला, वहीत, कीर्दसार, लागवडीचा. Cul'tiva'tor n. शेतकरी m, शेतखप्या, कृषिजीवी. २ अभिवृद्धि करणारा, संवर्धक.[ FACTUAL C. OF A FARM करदा. NON-RESIDENT C.ओवंडेकरी, केवी.] Culture (kill'-cher) [Fr.-L. cultura, from colere, to till] n. पिकाकरितां जमीन तयार करणे n. ३ सुशीलता f, विनय (S.), विनीतता f, नम्रता f, बुद्धिविकासन n, (बुद्धीची) सुधारणा f, संवर्धन n , अभिवृद्धि f, सुसंस्कार m, उन्नति f, उत्कर्ष m. Cul'turable a. मशागत करावयास पात्र-योग्य. Cul'tural a. Cul'tured p.a. विनीत, मशागत केलेला. Cul'ture'ness a. Cul'turist n. संवर्धक, अभिवृद्धि करणारा, शेतकरी, शेतखप्या. Culver (kul'-ver ) [ A. S. culfre, a pigeon.] n. ख(क) बूतर n. Culver-tailed a. वज्रकळाशी केलेला. Culver-house n. खुराडें n. Culverin (kul'-ver-in) [from culevrin,-Fr. coule vrius. L. coluber, an adder. ] n. क प्रकारची तोफ f, बंदुक f, कलव्हरीन f. Cul'verineer n. अशा तोफेवरील गोलंदाज m, अशा तऱ्हेची बंदूक वागविणारा शिपाई m, कलव्हरीनवाला m. Culvert (kul'-vert) [Origin doubtful.] n. रस्त्याखालून पाणी जाण्याकरिता केलेले गटार n. Culvertage (kul'vertaj) n. मुख्य स्रोताचा निवळ शेतखप्या बनणे n. Cumbent (kum'-bent ) [L. cumbare, to lie down.] a. खाली पडलेला. Cumber ( kum'-ber ) [O. Fr. combrer, from L.L. cumbrus, a mass. Perhaps from cumulus, heap. ] v .t. अडथळा m-अडचण f. करणे-आणणे. २ मोडा घालणे, ओझे घालून अडविणे, ओझें घालणे. ३ कष्ट m- दुःख देणे. C. n. (obs.) त्रास देणे n, अडचण f, जुलम m, त्रास m. Cum'bered a अडथळा केलेला, &c.