पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/905

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुरेराख्या used contemptuously and as corresponding with clown, clodhopper, boor'; आडमुठ्या , कांवळ्या, घोंगड्या, रान्या, रानकरी, रानट, जंगलट. Country-side n. खेडेपाड्याचा भाग m. Country-woman n. खेडेगांवांत राहणारी स्त्री f, खेडवळ स्त्री f, २ स्वदेशभगिनी f. Country-cousin n. (शहरांतील रीतीभाती माहीत नसलेला) खेड्यांतील आपला आप्त m. Country-gentleman n. खेडेगांवीं जमीनजुमला करून तेथेच कालक्रमण करणारा गृहस्थ m, खेडेगांवांतील सुखवस्तु गृहस्थ m. Country-town n. भोवतालच्या शेतीभातीवर अवलंबून असणारे शहर n. To go to the C. or to appeal to the C. to dissolve parliament in order to ascertain the wish of the country by a new election of representatives प्रतिनिधीच्या नव्या निवडणुकीने लोकमत जाणण्याकरितां पार्लमेंट (प्रतिनिधिसभा) बरखास्त करणे. County, See Count (I). Coup (koo) [Fr, a blow, a stroke. ] n. ठोंसा m, गुद्दा m, टोला m. २ (billiards) दुसऱ्या गोटीस धक्का न लावतां गोटी नेमक्या घरांत ढकलणे n. Coup d'e'tat n. राज्याची उलटापालट होईल या खोट्या भीतीने घेण्यात आलेले असुरी उपाय, ह्मणजे अशा प्रकारचे अमक्या अमक्यांचे विचार असावेत अशा समजुतीनेच त्यांस प्रतिबंधांत ठेवणे, इ. २ प्रजेवर आणलेली गदा f- घाेरपड f. Coup de grace [ Fr. a stroke of mercy.] a finishing stroke अतिशय जोराचा ठोंसा m, शेवट करणारा घाव m, शिरच्छेदाची ज्याला शिक्षा झाली असेल अशा अपराध्यास वेदना होऊ नये ह्मणून एकच घाव असा जाेराचा घालावयाचा की त्याचे शीर व धड ही एकदम अलग व्हावीत. Coup de main (koo-demang) [ Fr. a Storke of hand.] n. आकस्मिक हल्ला m, छापा m, घाला m. Coup de maitre [ Fr. a master stroke. ] n. अप्रतिम ठोसा m, नामी काम n, टोला m, चांगल्या रीतीने ध्यानांत राहील असा तडाका m. Coup de theatre [Fr. stroke of theatre.] लोकांच्या मनावर काही विशेष व कायमचा ठसा उमटावा ह्मणून नाट्यप्रयोगाचे वेळी अभिनयात केलेला आकस्मिक फेरफार m. २ एखाद्या गोष्टीचा परिणाम व्हावा ह्मणून काढलेली युक्ति f, लोकांच्या मनावर परिणाम करण्याची युक्ति f. Coup d'aeil (koo-del')[Fr. a stroke or glance of the eye.] n. a single view of anything एकाचवेळी नजरेने दिसणारा देखावा m. Coup de soleil ( koo-de-sol-il' ) [ Fr. a stroke of the sun.] n. sunstroke उन्हाचा चटका m, झळ f, झळई f. आंच f, आही f, उन्हाची झळा f, तिरमी f, तिरीप f, लूक f. Coup ( kowp) [ Scot.-Ice. kaupa, to buy. ] v. t. अदलाबदल करणे. Couper n. उदमी m, व्यापारी m, देवघेव करणारा. Coup (kowp ) [ Fr. couper, to cut.] v.t. उलटा-उपडा करणे-पाडणे.