पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/792

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३ thing compiled संग्रह m, संग्रहग्रंथ m. Compil'er Com'pilator n. निरनिराळ्या ग्रंथांतून एक नवीन ग्रंथ तयार करणारा, संकलनकर्ता, संग्रहकर्ता, संग्राहक. Complacent (kon-pla'sent ) [ L. complacens, very pleasing, from com, and placere, to please. ] a. समाधानाचा, समाधानयुक्त, संतोषाचा, संतोषयुक्त, खुशदिल, प्रसन्नचित्त, प्रीतात्मा. २ सभ्य, भला, सुशील. Complā'cence,-cy n. pleasure, or satisfaction in One's own condition or doings समाधान n, संतोष m खुशाली ( loosely ) f; as, "'The inward C. we find in acting reasonably and virtuously.” a pleasantness of temper or mien स्वभावाचा गोडपणा m. भलाई f, सौजन्य n, भीडस्तपणा m. ३ the cause. pleasure. सुखास कारण n. Complacently adv. संतोषाने, समाधानानें, संतोषपूर्वक, सुखाने. Complain ( kom-plān') [ Fr. complaindre.-L.L. con & plangere, to beat one's breast or head in sign of grief, to lament aloud. ] v. i. ( with of) of murmur कुरकुरणे. २ to lament रडणे, विव्हळणे, खेद करणे, (असंतोष) कळविणे, बिलाप-दुःखोदार काढणे, दुःख करणे, हायहाय करणे, रडगाणे गाणे. [ To C. FEEVISHLY किरकिर-पिरपिर करणे, किरकिरणे.] ३ (with of) to make a formal accusation तकरार f. करणे, फिर्याद करणे-ठोकणे, नालस्ती करणे-सांगणे, दाद लावणे, अभियोग करणे, तोहसत घेणं, गिल्ला करणे, आरोप करणे. ४ (of pain) दुखणे-रोग आहे असे सांगणे, कण्हणे, कुंथणे, कुथणे. Complain'ant n. law. वादी, फिर्याद करणारा, फिर्यादी. २ पूर्ववादी, भाषावादा (?) अग्रवादी, पूर्वपक्षी. Complain'er n. दुःख करणारा, रडणारा, किरकिरा, पिरपिरा. [SOME TERMS FOR- A PERSON EVER. COMPLAINING ARE :-रडका,रडवा, रड्या, रडतोड्या, रडतराऊत AND FOR A FEMALE रडतलक्षमी रउतपार्वती, रडतगौरी, रडवी.] Complain'ing a. किरकिरा or -ऱ्या , पिरपिरा or ऱ्या C. v.n रडणे n. विव्हळणे n. Complainingly ac Complaint n. रडणें , विव्हळणे, विव्हळm, खद विलाप m. २ cause of complaining दुःखास कारण n, दुःखहेतु m, दुख n, रड f, गाऱ्हाणे. ३ malady रोग m, दुखणे n, दरद f, व्याधि f, पीडा f. ४ (a) law. charge वाद m, पूर्वपक्ष m, आक्षेप m. फिर्याद f. (b) दाद f. ५ कागाळी f, कुरकुर f, गाऱ्हाणे n, गिल्ला m. [PEEVISH COMPLAINT रडगाणे. किरकिर, पिरपिर, कुरकुरः PITEOUS COMPLAINT रगडणे. A SIRING OF PITEOUS COMPLAINTS रडकथा f, कपाळकहाणी f.] ६ कागाळी f, दाद f. To go or come to lodge a C. फिर्याद जाणे-येणे. Complaisant (kom'plā-zant) [ Fr. complaisant p. p. of complaire, to acquiesce in order to please :-L. complacere, to be very pleasing to. ] a. disposed please, obliging, politely agreeable गोड स्वभावाचा, आपल्यापेक्षा खालील दर्जाच्या मनुष्याशी दुसऱ्याशी मिळून वागणारा, बोलून चालून गोड, उपयोगी, भिडस्त