पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/778

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

authority सनद f, अखत्यारनामा m, पत्रक n, नियोगपत्र n, अधिकारपत्र n. ४ दिलेला हुडा m- अधिकार m- असामी f. ५ नियोजन n, पंच-कमिशन मंडळी f, पंच m. pl. ; as, The Police Commission. ६ com. allowance made to a factor कमिशन n, अडत f, दलाली f. ७ order काम n, फरमाश (स). ८ (वाईट काम) करणे n, बनवणे n, दुराचरण n, वाईट कर्म n, दुष्कर्म n. C. v. t. to authorize, to empower अखत्यार m, अधिकार m. देणे. २ mil. सनद f. देणे. ३ नियोजन करणे, नियुक्त-अधिकृत करणें, अधिकार देऊन पाठविणे. ४ to order अधिकार देऊन बाहेरगांवीं पाठविणं, फरमाश(स) देणे-करणे. Commission agent दलाल m, अडत्या. Commission merchant अडत्या, अडत किंवा दलाली घेऊन माल विकणारा, व्यापारी दलाल. Commissionaire' n. (सार्वजनिक ठिकाणी किंवा भोजनवसतिगृहांत) निरोप पोंचविणारा किंवा अल्प किंमतीच्या जिनसा प्रवाशांना अडत घेऊन आणून देणारा मनुष्य m. Commissi'oned a. अधिकृत, नियुक्त, अखत्यार दिलेला-पावलेला. २ सनद दिलेला. Commissi'oner' n. person commissioned. मुखत्यार m, विशेष काम करण्याकरितां नेमलेला मनुष्य m- नियुक्त ( used as noun) अधिकृत ( as a noun). २ विशिष्ट खात्यांचा एक सरकारी मुख्य अधिकारी m, प्रतिनिधि m, कमिशनर (पोलिस कमिशनर) m. Commissionership n. कमिशनरचा हुद्दा m. Commissioned officer आरमारावर लेफटेनंटपासून वरचे शासनपत्रानुरोधाने नेमलेले अधिकारी. Commission of the peace जस्टिस ऑफ दि पीस नेमण्याकरितां शिक्कामोर्तबाचें राजशासनपत्र. To put a ship (or vessel) in or into commission सरकारी जहाजावर दारूगोळा वगैरे भरून कुमकेकरितां ते लढाईवर पाठविणे, कामगिरीवर पाठविणे. To put a ship (or vessel ) out of commission खलाशी व कामगार दुसरीकडे बदलून एखादें जहाज लढाऊ जहाजांतून कमी करणे. Commissionaire, See Commission. Commissure (kom'mis-shūr) [L. commissura, a joining together from the root of Commit.] n. कोपरा m, सांधा m. २ bot. संधिस्थान n. सांध्याची रेषा f, सांधा m. anat. (मस्तिष्कीय गोलार्धाचे) संधायक तंतु m. pl., जोडणारे तंतु m. pl. Commis'sural a. संधिस्थाना-सांध्यासंबंधी. Commit (koni-it') (L. com, with & mittere, to send.] v. t. to consign, to entrust, to deliver to (with to or unto ) सोंपवणे, समर्पणे (S), हवालणे, निरवणे, ओपणे, हवाली देणे-ठेवणे, स्वाधीन करणे, spec. वरिष्ठ कोर्टाकडे पाठविणे. २ (work or business) पदरी घालणे, माथीं मारणे, सांगणे ( loosely ). ३ to imprison प्रनिबंधांत-अटकेत-ठेवणे, हवाली करणें, तुरंगाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या स्वाधीन करणे, कैदेत घालणे; as, "These two were Committed.” ४ to perpetrate (as a crime, sin or fault) (दुष्कृत्य) करणे, आचरणे; as, "Thou shalt