पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/735

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

con.] prefix सम्, सम, समान, सह, स, एक, एकत्र. [ COALITION संधि; Co-EXPANSION समविस्तार ; CORELIGIONIST समानधर्मी; Co-OPERATIVE: सहकारी; CoWIFE सपली; Co-CENSTIC एककेन्द्रिक ; Co-EXIST एकत्र असणें.] २ Company शब्दाचें संक्षिप्तरूप; जसे, The Western India Publishing Co. ३ math. Complement शब्दाचे संक्षिप्तरूप; जसें, Co-sine कोटिज्या, किंवा कोज्या; co-tangent कोटिस्पर्शज्या, किंवा कोस्पर्शज्या. Coacervate (ko'aser'vāt) [L. CO & acervare, acervatus, to heap up.] v. t. ढीग m- रास f, करणे (R.). C. a. राशीकृत, जमलेला. Coacervation n. रास, ढीग(R.). Coach (koch ) [Fr. coche, coach ; Said as carly as A. D. 1553 to be a Hungarian word; from kocsi, a coach, so called because it was first made at a Hung-village called Kocsi, or Kocs, near Raab, in Hungary.] n. a carriage गाडी f, रथ m. २ परिक्षेत पास होण्यापुरतें उत्तम रीतीने शिकविणारा खाजगी शिक्षक m. ३ बोटशर्यतीसाठी तयार करणारा शिक्षक m, कसरत शिकविणारा, तालमीतील वस्ताद m. ४ naut. (obs.) लढाऊ गलबताच्या कप्तानच्या केबीनपुढची मागील बाजूवरील खोली f. C. v. t. रथांत नेणे, गाडीत नेणें. ५ खाजगी शिक्षण देऊन तयार करणे, खाजगी शिक्षकाजवळ शिकणे. C.v.i. (sometimes used with it) colloq. रथांतून जाणे; as, "Coaching it to all quarters." Coach-box n. गाडी हाकणाऱ्याची बसावयाची जागा f, कोचपेटी f. Coach'-dog n. गाडीबरोबर धांवणारा एक जातीचा कुत्रा m. Conchee', or Coach'y n. गाडीवान m, गाडी हाकणारा m. Coach'-fellow n. जोडीदार घोडा m. २.fig. जोडीदार, सोबती m, सवंगडी m. Coach-hire n. गाडीभाडे n. Coach'horse n. गाडीचा घोडा m. Coach'-house n. रथशाला f, गाडीखाना m, ( loosely) तबेला m. Coach'ing n. घोड्याच्या गाडीने-चा प्रवास m. २ गाड्याने जाणे-येणे n. ३ परीक्षेकरितां तात्पुरतें घेतलेले शिक्षण n. Coaching. clerk n. प्रवासाची टिकिटे विकणारा. Coach'man n. गाडीवान m, सूत m, सारथि-थी m. Coach'manship n. गाडीवानाचे काम n, अश्वनियंतृत्व n. Coach'-master n. गाड्या भाड्याने देणारा, गाडीभाड्याचा धंदा करणारा. Coach'office n. (बंग्या) पार्सलें करण्याचे व प्रवासाची टिकिटे घेण्याचे हपीस n. Coach'-stand n. गाड्यांचा अड्डा m. Coach'-wheel n. गाडीचे चाक n. Coach'whip n. चाबूक m. Coach'y a. गाडीसंबंधींचा. २ गाडीच्या घोड्यासारखा. Hackney coach n. भाडोत्री गाडी f. Mail coach डांकगाडी f, टपालगाडी. Stage coach टप्पेगाडी f, टप्याटप्यावर थांबून उतारू नेणारी गाडी f. Coact (ki-akt') [L. coactars, intensive from cogere, coactum, to force. ] v. i. (obs. ) to act together, (Shakes.) जुटीने काम करणे. Coact'ive a. (Shakes.) जुटीचा, जुटीनें-बरोबर काम करणारा. Coactiv'ity n. कार्यसहकारित्व n.