पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




to shout.] n. आनंद-पसंती-संमतिदर्शक जनसमूहानें केलेला गजर m, जयजयकार m, जयघोष m, जयशब्द m, एकगजर m, प्रशंसोद्गार m, धन्यवाद m. Acclaim' v.t. and n. धन्यवाद करणें. Acclam atory a. जयजयकार दर्शित करणारा.

Acclimate (ak.kli'mat ) v.t. See Acclimatize.

Acclimatize (ak-klim'at-iz) [ Fr. acdimater, to acclimate.) v.t. habituate or innure to a climate not native परदेशच्या हवेच्या संवयीचा-सात्म्याचा-&c. करणें. Also Acclimate. Acclimated, Acclimatized p. and a. (v.V.) परदेशच्या हवेच्या संवयींचा केलेला, &c. To be A. परदेशच्या हवेशीं सात्म्य होणें, हवेचा राबता m. -राब m. पडणें, all with or ला of s. हवा.f-&c. शरिरास-प्रकृतीस मानून जाणें-परिचयानें-संवईनें मानवणें, हवा f. आंगवळणी पडणें. Acclimatisation n. Also Acclimation, Acclimatation n. हवा आंगवळणी पडणें n.

Acclivity (ak-klivi-ti) [ L. ad, to, & divus, a slope.] n. चढण f, चढ m. २ rising ground चढण f, चढाव m, घाटी f, डाग m. (obs.). Accli vous a. चढता, चढावाचा, चढणीचा, चढता. also Accliv'itous.

Accomodate (ak-kom'mod-at) [ L ad, to, & com-modus, fitting. ] v. t. supply with convenience सोयी(य) करणें, बेगमी or बेजमी f,करणें, गरज f. चालविणें. २ adapt जमा m-जवा m-जुगलf -जुळणी f-&c. बसविणें-पाडणें-घालणें-करणें, जमवणें , जुळेलसें करणें, जुळवून घेणें. ३ reconcile जमवणें, जुळणी f-जम m-मेळ m-समेट m- मिलाफ m-घालणें-करणें-करून देणें. ४ पुरवणें, अडचण f.दूर करणें-भागविणें. ५ com. हमी f. देणें. Accommodating a. सोय करून देणारा, &c. २ भिडस्त. Accommodation n. राहण्याची-जाग्याची-बिऱ्हाडाची सोय f. २ मिलाफ m, मेळ m.३ com. पैसे उसने देणें n. ४ law तोडजोड f. Accom'modative a. सोय करणारा, जम बसवणारा, मेळ घालणारा, &c. Accom-modativeness n. Accom'modator n. सोय करणारा, गरज पुरविणारा, &c. Accommodation bill अनें बला दिलेल्या पैशाच्या तारणासाठीं बनें कवर दिलेली हुंडी, अशा हुंडींत कच्या अजवळ असलेल्या पतीबद्दल बला फायदा मिळतो. पैशाच्या सोईकरितां तिसऱ्यानें हमी दिलेली हुंडी f.

Accompany (ak-kum'pan-i) [ L. ad, to, & compagnon, a companion.] v. t. go or come with बरोबर-संगें (R)संगती (R) or-तें समागमें सहित-&c., जाणें-येणें-चालणें &c., सहगतिf,-सहगमन n-साहचर्य n- सहचरत्व n. करणें. २ संगें (R)-संगतीं (R)-समागमें-&c-बराबर असणें-राहणें, संगतींत असणें with g. of o., संग(?) m-समागम m-सहवास m-सोबत f.करणें, संघटणें (poe.), सहस्थिति f-सहवर्तमानत्व n करणें, साथ f. करणें, Accompanying p. a, Accom'panier n. (v. V. 1.)-act. बरोबर जाणारा-येणारा-चालणारा, सहगति-