पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/541

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to fall, to fall dead. Perhaps allied to Sk. शद्, to fall. Some connect Cadaver with कलेवर.] n. a dead human body प्रेत n, शव n, मढें (डें) n. Cadav'eric a. relating to a corpse प्रेतासंबंधी, शवासंबंधी. Cadav'erous a. प्रेत-सदृश, शववत्, मढयासारखा . २ pale, ghastly प्रेतकळा आलेला, प्रेतकळायुक्त, मुढद्यासारखा, मृतप्राय; as, A C. look.' Cadav'erously adv. Cadav'erousness n. (v. A. 1.) प्रेतसादृश्य n, प्रेतसदृश्यशता f, प्रेतपणा m, शवपणा m. २ प्रेतकळा, मढे (डे) कळा f. Caddis ( kail'dis ) ( Fr. cadis, a sort of serge. ] n. सर्जाचे एका जातीचं खरखरीत कापड n. See the word Serge. Caddy (kad'i) n. हा ठेवण्याची लहान पेटी f. Cade (kād) [L. cades, a cask.] n. (obe.) पिंप, पीप. Cade (kad ) [ Ety. unknown. ] v. t. लडिवाळपणाने पाळणे, पोषण करणे. C. a. लडिवाळपणाने पोसलेला. C. n. a pet lamb आवडते कोकरूं n. Cadence (ka'dens ) [ L. cadere, to fall. ] n. (of the voice ) उतरता स्वर m, वाक्याचे शेवटीं पडता आवाज m, उतार m. २ tone in reading बोलण्याची-वाचण्याची ढब-रीत. ३ स्वरपात m, गाण्याचा विराम m, स्वरसंक्रम M. ४ स्वरावरोह m, स्वरांचा नियमित अवरोह m. ५ mil. घोड्याची समकालीन-सारखी चाल f. C. v. t. तालसूर लावणे, चीज वगैरे तालसुरांत बसवणे. Ca'denced a. तालबद्ध, नियमित चढउताराचा. Ca'dency n. See Cadence. 2 descent of a younger branch from the main line of a family मूळवंशापासून आलेल्या धाकटे घराण्याचा संबंध. Ca'dent a. ( R.) खाली जाणारा-पडणारा, उतरत्या स्वराचा. Caden'za. n. मुक्ताई, (सं. मुक्तस्थायी), गायनांत किंवा वाद्यांत आलापाच्या प्रत्येक भागाचा अंत दाखविणारा स्वरविशेष. Cadet (ka-det') [L. L. capitellun, dim. of caput, the head.] n. कनिष्ठ-धाकटा (ज्येष्ठेतर) भाऊ-मुलगा m. २ (एकाच राजघराण्यांतील) कनिष्ठ पातीचा-धाकट्या घराण्याचा-धाकट्या शाखेचा पुरुष m. ३ लष्करी-आरमारी पाठशाळेतील विद्यार्थी m. ४ mil. लष्करी खात्यांत सनदी अधिकाज्याची जागा मिळविण्यासाठी उमेदवारी करणारा मनुष्य m. Cadet'ship n. Cadge ( caj) [cadge, the round frame of wood on which hawks were carried.] v.i. भीक मागणे. Cadger n. भीक मागत फिरणारा. २ लोणी, अंडी, कोंबडी व बदके बाजारात विकण्यास नेणारा मनुष्य m. ३ किरकोळ जिन्नस विकणारा फिरता वाणी m. ४ रस्त्यांतून माल घेऊन ओरडत फिरणारा, खेडेगांवचा माल शहरांत विकण्यास नेणारा व शहरांतील माल खेडेगांवांत पुरविणारा व्यापारी, फेरीवाला.

Cadi ( ka'di ) [ Ar. qadi, a judge.] 2. काजी m, ग्रामन्यायाधीश m. मुसलमान लोकांतील जाति-धर्मासंबंधी खटले तोडणारा m.