पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2048

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बिनतोड, बेमालूम, अखंडनीय, खंडन करण्यास -खोडून टाकण्यास अशक्य. Irrefragability n. निरुत्तरता f, अखंडनीयता f. Irrefragably adv.
Irrefutable ( ir-ro-fūt'a-bl ) a. that cannot be refuted or proved false बिनतोड, खोटा पाडतां न येणारा. Irrefutably adv. बिनतोडपणाने.
Irregular ( ir-reg'ū-lar ) [ L. in, not, and Regular. ] a. not according to rule नियमाबाहेरचा, नियमबाह्य, अनियत, बेकायद्याचा, कायद्याबाहेरचा, गैररीतीचा, गैरचालीचा, गैरमार्गाचा, अशास्त्र, विधिविरुद्ध, भविधि, अयथाशास्त्र, अयथाविधि, उत्सूत्र. २ unnatural सृष्टिक्रमाविरुद्ध. [ AN I. DIET कुपथ्य, अपथ्य.] ३ unsystematic व्यवहारांत अनियमित निष्काळजी, नियमाबाहेर वागणारा,अपद्धतशीर,पद्धतिबाह्य, (b) क्रमबाह्य,अक्रमिक. ४ vicious अनाचारी, असन्मार्गी, आडमार्गी, गैरचालीचा, गैरमार्गाचा, विपथगामी, अपथवर्ती, आडमार्गाने जाणारा. ५ (gram.) departing from the ordinary rules in its inflection अपवादक, निपातित, सूत्रबाह, नियमबाह्य. ६ unequal विषम, असम, उंचसखल, उंचनीच. Irregularity n. नियमबाह्यता f, अनियतता f, नियमातिक्रम m, नियमोल्लंघन n, अविधिता f, अशास्त्रता f, गैरशिस्तपणा m. २ अक्रम m; क्रमाभाव m, अव्यवस्था f, व्यत्यास m. ३ अनाचार m, अनाचरण , गैरचाल, गैरवर्तणूक, कुपथगमन . ४ उच्चनीचपणाm, उंचसखक पणा m, विषमता f. ५ अपवादकता f. Irregularly adv. बेकायदा, कायदा सोडून, गैरमार्गानें, गैररीतीने. २ क्रम सोडून, क्रमावांचून.
Irrelative ( ir-rel'a-tiv ) a. not relative, unconnected असंबंधी, संबंधरहित, निराळा. Irrelatively adv.
Irrelevant ( ir-rel'e-vant ) a. not relevant, not bear's ing directly on the matter in hand अप्रस्तुत, अप्रकृत, अप्रासंगिक, प्रसंगाबाहेरचा, चालू विषयाबाहेरचा, इकडचा तिकडचा. [I. DISCOURSE आडकथा f, भाकडकथा f, आडरान n, इकडं तिकडं n.] Irrelevancy n. अप्रस्ततता f, अप्रासंगिकत्व n, प्रस्तुत विषयाला सोडून असणे n. Irrel'evantly adv. प्रस्तुत विषयाला सोडून.
Irreligion ( ir-re-lij'un) [ Prof. in, not, & Religion. ) n. want of religion धर्मोदासीन्य n, अधर्म m, अधर्मनिष्ठा f, धर्मलोप m. २ impiety देवनिंदा f, असाधुता f, अभक्ति f. Irreligious a. अधार्मिक, अधर्मनिष्ठ, धर्महीन, दुष्ट, पापी. Irreligiously adv. अधर्मानें.
Irremediable ( ir-ro-mē'di-&-bl ) a. not remediable, shat cannot be remedied or redressed उपाय करिता येत नाही असा, परिहार किंवा प्रतिकार करितां येत नाही असा, निरुपायाचा, अनुपाय, उपायहीन, उपायातीत, पायाबाहेरचा, अचिकित्स्य, दुःसाध्य, बेइलाजाचा, अपरिजारीपरिहाराशक्य,उपायाशक्य,प्रतिकारशक्य. Irreme'diableness n. निरुपायता f, उपायराहित्य n, असाध्यता f. Irremediably adv,