पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1980

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ accompanied with the excitement of the arterial action सदाह, दाहविशिष्ट, दाहिक, दाह (in comp. as, दाहज्वर=I. fever). ३ tending to excite anger संताप किंवा शोध उत्पन्न करणारा, चेतविणारा. ४ seditious (सरकाराविरुद्ध) चेतविणारा, बंडाळीचा, फंदफितुराचा.
Inflate (in .flāt') [I, in, in & flare, to blow.) v. t. to blow into, lo puff up, to swell with air (वायुने-वान्याने) फुगवणे, फुगीर करण; as, "To inflate the lungs." २ (fig.) to swell, to puff up, to elate गर्वाने फुगवणे, शेफारवणे, माजवणे, मातवणे, फुगेसा -मातेसा करणें, उन्मत्त करणे; as, "To I. with pride." ३ to cause to become unduly expanded मर्यादेबाहेर वाढवणे, फैलावणे, ताणणे, फुगवणे; as, "To I. the currency." I. v. i to expand वायाने वायूनें फुगणे. Inflated bot. आध्मात, स्फीत. २.फुगवलेला. ३ उद्धत, शेफारवलेला. ४ मर्यादेबाहेर वाढवलेला; as "I. prices." Inflation n. फुगविणे n, फुगवणीf, फुगवणूकf, फुगवण f. २ med. आध्मानn, आध्मापन n, वायूने फुगणे m, वायूने फुगवणे n. ( state) फुगवशीf, फुगारा m, फुगो (गव)टा m, फुगोटीf, फुगवटी f. ३ conceit, the state of being puffed up माज m, पतराजf, दिमाख m, आढयताf , जब f. ४ मर्यादेबाहेरचा वाढावा m. Inflatus n. a blowing or breathing into आंत वारा भरणे n, वातपूरण n. २ inspiration स्फूर्तिf, प्रेरणाf, वारें n, संचार m, अवसर m.
Inflect (in-flekt') [ L. in, into, & flectere, to bend.] v. t. to bend in, to bend or turn from a direct line वांकवणे, लववणे, झोंकवणे, कलवणे, झांक देणे. २ gram. to vary a noun in its terminations (शब्दाला) विभक्ति लावणे, शब्द -रूप चालविणे, क्रियापदाची रूपें चालविणे. ३ to modulate (as the voice) (स्वर) उच्चनीच करणे, स्वरभेद करणे, खांचखोंच घेणे. Inflected a. नमित, वांकवलेला, झोंकवलेला. २ विभत्तयंत, सविभक्तिक, जातरूपांतर, प्राप्तरूपांतर. Inflection v. वांकवणे, वांकवणी f. २a bend, a fold वळणn , वांकण n, वांक n. ३ math. बांक n, संधि m, सांधा m. ४ a modulation of the voiceस्वरभेद m.५ the variation of nouns and verbs विभक्क्तिकार्य n, विभक्तिf, लिंगकार्य n, रूपांतर n. Inflective a. वांकविणारा, लववणारा. २ subject to inflection विभक्तिकार्य -लिंगकार्य रूपांतर -क्षम.
Inflexible (in-fleks’i-bl ) a. that cannot be bent, unbending ताठ, न वांकणारा, न नमणारा, ताठर, अनमनीय. २ firm in purpose, not to be changed. निग्रही, दृढसंकल्पी, आग्रही, चिकट, चिवट. ३ unalterable बदल न होणारा. ४ math. ताठर, कठिण.Inflexibility n. unyielding stiffness ताठ M ,ताठपणा m, ताठरपणा m, अनमनीयताf. २firmness of will or purpose, resoluteness दृढसंकल्पताf, निग्रह m, आग्रह m, आग्रहीपणा m. ३ obstinacy हेका m, हेकटपणा m, दुराग्रह m, दुराग्रहीपणा m.