पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1933

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अस्याग्रह m, मित्रतf , मिससवारी f, मिमतमाना m, चिकटपणा m. [ IMPORTUNITY OF CHILDREN AND BEGGARB जिकीरf, चेंगटाई f, गळग्रह m. माथाकूटf : माथेफोड f, जिगजिगf.] Importune v.t.to urge with troublesome application, to press urgently अस्याग्रहाने मागणे, त्रास देऊन लॉचटपणाने मागणे, मिलतf, मिनतवारी f. मिक्षतमाना m. करणे करून मागणे, ग्रह धरून मागणे, गळ घालणे, गळ घालून मागणे. -esp. of children and beggars गळी पटणे, गळचिपी बसणे, गळग्रह घालणे, दांत विचकून मागणे,(करिता) दांत विचकणे.
Importune ( im-por-tān' ) See under Importunate.
Impose ( im-poz' ) [ Fr. im, on, and poser, to place.] v.t. to place upon, to lay on (वर) घालणे -ठेवणे मांडणे -स्थापणे आरोपण करणे. २ to lay on, as a burden or duty कर जकात बसविणे, जकात ठेवणे, स्थापणे, (बोजा) घालणे, टाकणे, लादणे, माथीं मारणे. ३ to enjoin or command आज्ञापिणे, हुकूम देणे. ४ to lay on (as the hands) (दीक्षा वगैरे देतांना) मस्तकावर हात ठेवणे. ५ to arrange in proper order on a table or stone or metal for printing Present टाकणे,छापावर टाकणे, 'इम्पोज' करणे. I. v. i. to practice tricks or deception ठकविणे, फसविणे, (दगलबाजीने) गळी बांधणे, टोपी घालणे. [To I. UPON (ला) फसविणे, ठकविणे.] Imposable a. ठेवता किंवा बसवितां येण्याजोगा, &c. Imposing pr .p. a. laying as a duty कर म्हणून बसविला जाणारा. २ impressive, commanding असरकारक, भपकेदार, ढबदार, ठळक, भव्य, विस्मयावह, अद्भुत. ३ deceiving फसवणुकीचा, फसवणारा. I. v. n. शिळेवर टाईप मांडणे n, टाकणे n, मुद्रास्थापन n. Imposingly adv. ढबदार रीतीनें. Imposition n. स्थापना f,स्थापन n, (वर) घालणे n, लादणे n, बसविणे n, सोपणें n. २ burden, tax शिक्षाf, दंड m, कर m, जकातf, बोजा m, भार m. ३ (Eng. Univ.) an extra exercise enjoined on a student as a punishment शिक्षेदाखल दिलेला अधिक धडाm. ४ deception, fraud, imposture दगा m, पाखंड n, फसवणूकf , फसवणf, ठकवणf, ठकबाजीf. ५ मस्तकावर हात ठेवणे n.
Impossible (im-pos'i-bl )(L.in, not,and Possible.]a. that which cannot be done, that cannot exist, absurd.(सृष्टिनियमांप्रमाणेच) अशक्य, घडायाचा नाही असा, व्हायाचा -हायाजोगा नाही असा, असाध्य, असंभाव्य, अघटमान, (fig.) खपुष्पायमाण, मृगजलवत्, शशशंगायमान. Impossibility n. अशक्यताf, असाध्यताf, असंभाव्यताf, असंभव m. २ an impossible thing अशक्य गोष्ट f, अशक्य विषय m. To assert impossibilities or absurdities अशक्य तेच नाही तेच बोलणे सांगणे. To attempt impossibilities अशक्य तें करं पाहणे, नाही तेच करणे, मृगजलस्नान कर पाहणे, धोड्याचा दोर काढण्याचा प्रयत्न करणे. N. B. Nowadays there is a growing tendency with