पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1931

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Implex (im'pleks ) [L. implexus -implecto -in, into, and plectere, akin to Gr. plekein, to twine.] _a. not simple, complicated गुंतागुंतीचा, कठीण, मुष्किलीचा. Implexus a. bot. interlaced अंतर्गुफित.
Impliable ( im-pli'a-bl ) a. ताठ, मागे न घेणारा, हार न खाणारा.
Implicate (im'pli-kāt) [L. in, in and plica, a fold.]v. t. to infold, to involve, to entangle गुंतवणे, गोवणे, गोवून गुंतवून घेणे टाकणे, सामील आहे असे दाखविणे. Implicated pa. t. & p. p. गोवलेला, गुंतलेला. [CRIMINALLY I. लिप्त, लिप्ताळा.]. Implication n. -the act. गोवणे n. २ गुंतागुंतीf, सामिलीf, सामिलगिरीf, आक्षेप m. ३ that which is implied ध्वनितार्थ m, मथितार्थ m, ध्वनि m, लक्ष्यार्थ m, अन्वय m, अनुमान n, अटकळ f, व्यंजनाf, उपलक्षणाf, ध्वननn , ध्वनितदर्शन n. Implicative a, tending to implicate • सामील करणारा. Implicatively adv.
Implicit (im-plis'it) [ Lit. infolded -L. in, in, and plica, a fold. याचा मूळ अर्थ 'गुंतलेला, गोवलेला' असा होता.] a. tacitly comprised, implied गर्भित, ध्वनित, अनुमानसिद्ध, फलित, अर्थसिद्ध, अंतर्गत, अंतर्भूत. २ trusting fully the word or authority of another (as faith or obedience ) पुरा, पूर्ण, साफ, निखालस, निःसंशय, निर्विवाद, निर्विकल्प, अनन्यभावाचा. Implicitly adv. अनन्यभावानें, बिनदिकत. २ ध्वनितार्थाने. Implicitness n. ध्वनितताf. ३ पूर्णपणा m, &c.
Implied, See under Imply.
Implore (im-plor' ) [ Fr. implorer -L. in (in), on, and plorare, to wail. ] v.t. to pray earnestly, to entreat (only one's equals) पायां पडून -हातापायां पडून दाढीस हात लावून पदर पसरून मागणे, काकळूत करणे, काकळुतीस आणणे. I. v. i. to entreat, to beg मागणे, विनंति करणे. Implorer-n. काकळुत करणारा, &c. Imploringly adv. काकळुतीने, काकळूत करून. N. B. :-We implore only our equals; we supplicate only our superiors.
Imply (im-pli' ) [ Lit. to infold -Lit, and plica, a fold. ] v. t. to include in reality (खरोखर) आंत समावेश करणे. २ to mean, to signify फलितार्थाने दाखविणे दर्शवणे सुचवणे -सिद्ध करणे, गर्भित करणे. To be implied गर्भित ध्वनित -फलित असणे. Implied a. known by implication, inferential ध्वनित,गर्भित, अर्थसिद्ध, फलित, उपलक्षित. [I. COVENANTS ध्वनित गर्भित करार. I. MALICE (कायद्याच्या दृष्टीने) गर्भित -ध्वनित दुष्ट हेतु m. I. TRUST (कोर्टात नजरेस आलेल्या गोष्टींवरून अथवा पक्षकारांच्या वर्तणुकीवरून कोर्टाने) मानलेली किंवा गृहीत धरलेली इमीf-जबाबदारी.f]
Impoison ( im'-poi-zn ) [L. in, and Poison. ) v. t. to affect with poison विष देणे घालणे. २to imbitter, to impair कह करणे, बिघडविणे.
Impolicy (im-pol'i-si) [Im + Policy.]n. inexpedi.