पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1921

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निश्चयी, निश्चयाचा, धीराचा, धीर (adj.), न पालटणारा बदलणारा. २ not capable of being moved or affected in feeling, unimpressible अविकारी, अव्यय, पामर न फुटणारा, न द्रवणारा, द्रव न येणारा, कठिण, ताठ (मन), घट्ट (मन).३ (law) स्थावर. I. n. स्थावर वस्तु ई. 2 pl. (law:) lands and things adherent thereto by nature स्थावर इस्टेटf चीजवस्तु f -माल m -माल. मिळकत f. Immovableness n. स्थावरपणा m, अचलता f. २ निश्चलता f, निश्चळपणा m. ३ काठिण्य n, ताठपणा m, (मनाचा) घट्टपणा m. ४ (law) स्थावरपणा m. Immovably adv. अढळपणाने, कायमपणाने, दृढत्वाने.
Immunity (im-mūn'i-ti) (Fr.-I. im ( = in), not, and munis, serving, obliging; cf. munus, service, duty. ] n. freedom from any obligation or duty, a particular privilege सूट f, मोकळीक f, माफी f, सोडf, सोडवणूकf. २ freedom, exemption मुक्तिf, राहित्य n, अभाव m, मुक्तता f, मोचन n; as, "I. from error, danger, exertion, &c.” The sense is brought out by prefixing अ or अन before & word; as, अभय, अपाप, अनायास. ३ med. protection by inoculation ( एखाद्या रोगापासून ) निर्भयताf. Immune' a. exempt: (a) सुटा, सुटलेला, मोकळा, माफी मिळा. लेला. (b) रहित. (c) (एखाद्या रोगापासून) निर्भय.
Immure (im-mūr') [Fr. -L. in, in, and murus, a wall. याचा मूळ अर्थ (-च्या) सभोवती भिंत घालणे बांधणे' असा होता. ] v.t. to wall in, to shut up, ( hence) to imprison (भिंतीच्या आंत) कोंडणे, कोंडून ठेवणे, तुरुंगांत घालणे -टाकणे, अटकेंत ठेवणे, कैद करणे. Immurement n. -the act. अडकवणेंn, कोंडणें n, &c. २ imprisonment कैद f, तुरुंगवास m, अटकf, कैदेची शिक्षाf.
Immutable (im-mūt'a-bl) [Fr. -L. in, not, and Mutable, which see. ] a. not mutable, unchangeable, unalterable अविकार्य, ज्याचा पालट होत नाही असा, बदलतां -फिरवतां न येणारा, अविकार, निर्विकल्प, विकारातीत, कूटस्थ, नित्यसम, सतत कायम राहणारा. Immutability n. अविकारताf, अविक्रियस्व n, अविकारीपणा m, नित्यसमताf, कायमपणा m. Immutableness n. Immutably adv. न ढळेसा, न फिरेसा, फेरबदल न होईसा.
Imp ( imp) [ Lit. and orig. a graft, offspring; from Low L. impotus, a graft -Gr. emphytos, ingrafted -en, and root phy:, to grow ; akin to Be. ] n. a little devil or evil spirit, a contemptible evil worker तरुणभूत n, सैतान m. I. . t. (falconry) to mend a broken or defective wing by inserting a feather, to qualify for fight तुटलेला किंवा कमकुवत असलेला पंख नवीन पीस घालून दुरुस्त करणे, (पक्ष्याच्या आंगी) उडण्यालायक शक्ति भाणणे. २ ( hence) to equip भरपूर तयारी करून देणे, सरंजाम देणे, समर्थ करणे; as, "Imp out our drooping country's broken wing". Imp ish a. सैतानासारखा.