पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1899

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

or: flavored and artificially frozen. थंडी मलई f, आईसक्रीम n. I. fall n. a glacier बर्फपात m, डोंगरावरून वहात येणारा बर्फ m. I. field n. यर्फक्षेत्र n. I. float, I. floe n. a large mass of floating ice तरंगता बर्फखंड m. I. house n. a house for preserving ice (वितळून जाऊ नये म्हणून ) बर्फ सांठविण्याची जागा, बर्फाचें घर n. I. machine n. बर्फ तयार करण्याचे यंत्र n, बर्फाचे यंत्र n. I. man n. One who deals in ice or retails it बर्फवाला, बर्फ विकणारा मनुष्य, बर्फविक्या, बर्फाचा दुकानदार, हिमविक्रेता m. I. pail r. (पिण्याचे पदार्थ थंड करण्यासाठी) बर्फाने भरलेलें पात्र n. 1. pick n. a sharp instrument for breaking ice into small pieces बर्फ फोडण्याचे हत्यार n. Ice pilot n. a pilot who has charge of a vessel, where the course is obstructed by ice (as in polar seas) बर्फाच्छादित समुद्रांत गलबत चालविणारा वाटाड्या नावाडी m. Ice plow (plough) n. a large tool for grooving and cutting ice (गलबतास मार्ग करण्यासाठी) बर्फ कापण्याचे -फोडण्याचे मोठे हत्यार n. Ice-spar n. ( min.) एक प्रकारचे खनिज द्रव्य n. Ice water n. water cooled by ice बर्फ घालून थंड केलेले पाणी n. २ water formed by the melting of ice बर्फ वितळून झालेले पाणी n. To break the ice to make a passage for boats by breaking the frozen surface बर्फ फोडून बोटींना रस्ता करणे. २ (fig.) to overcome obstacles and make a beginning, to introduce a subject ( पहिल्या अडचणी दूर करून) उपक्रम -आरंभ -सुरवात करणे,विषय काढणे .Ice v. t. to cover with ice बर्फाने आच्छादणे. २to freeze गोठवणे, थिजवणे. ३ to cover with concreted sugar घट्ट झालेल्या साखरेने मढवणे. Ice'd a. बर्फाच्छादित, हिमावृत. २ (बर्फाने ) गोठलेला, थिजलेला. ३ बर्फासारख्या पदार्थाने भरलेला ; as, " Iced cake.” I'cicle n. a hanging point of ice formed by the freezing of dropping water (गळते. पाणी थिजून त्याचा बनलेला) हिमकण m, हिमतुषार m; as "Icicle at the eaves of a house." I'cily adv. coldly थंडपणाने, थंडाईनें. I'ciness u. frigidity थंडपणा m, थंडाई f. २.want of animation औत्सुक्याभाव m, शैथिल्य n, मंदी f, थंडाई f. ३ coldness of affection प्रेमाचा अभाव m, नेहशून्यता f. I'cing n. covering of ice or concreted sugar बर्फाचें बर्फासारख्या घट्ट साखरेचे आच्छादन n. I'cy a. cold, frosty फार थंड, हिममय, हिमप्रचर, बर्फमय. २ without warmth of affection प्रेमोष्मविरहित, प्रेमोष्मशून्य.
Icelander ( is'land-er ) [From Iceland.] n. a native of Iceland आईसलंडचा रहिवाशी, आईसलँडर. Iceland'ic a. आईसलंडचा -संबंधी. २ आईसलंडचे रहिवाशाचा. ३ आईसलंडरसारखा. I. n. the language of the Icelanders आईसलंडर लोकांची भाषा f, आईसलैंडिक भाषा. Iceland spar n. min, a transparent variety of calcite, the best of which is obtained in Iceland