पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1883

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Humility, See under Humiliate.
Humiliate (hū-mil'i-āt ) i L. humiliatus p. p. of humiliare to make humble.) v. t. to make humble नम्र -लीन करणे, नम्रता -लीनता आणणे, ताठा उतरणें मोणे. २ to lower in condition, to mortify पाणउतारा m -मानभंग m. करणे, रग f मोडणे -जिरविणे. Humiliated pa. t. & p. p. Humiliating pr. p. & v. n. Humiliation n. abasement of pride, mortification पाणउतारा m, मानभंग m, रगमोड f. Humility n. modesty, humbleness, self-abasement निगर्दता f, गम्रावस्था f, नम्रता f, लीनता f, लीनपणा m, विनय m, लीनवृति f, नग्रवृत्ति f, गर्वराहित्य n,निरभिमानता f, निरहंकारिता f.

Humour (ū'mur ) [ O. Fr, humor (Fr. hummer ) -L humor -humeo, to be moist. या शब्दाचा moisture= ओलावा असा फार प्राचीन अर्थ होता. परंतु तो सध्या लुप्त झाला माहे. त्याचप्रमाणे प्राण्यांतील किंवा वनस्पती तील सहज किंवा विकृत स्थितीतला रस असाही Humour शब्दाचा अर्थ एके काळी होता, परंतु सध्यां तोही प्रचारांत नाही. ज्या ठिकाणी सध्या आपण lymph हा शब्द बापरतो त्याच ठिकाणी पूर्वी Humour हा शब्द वापरीत असत; जसें, “ There are no lymphs or humours in the constitution." ज्याप्रमाणे आपल्या आर्यवैद्यकांत मनुष्याच्या शरीरांत कफ, वात व पित्त हे तीन मूलधातु (?) कल्पिले आहेत व हे 'शरीरांत कमीजास्त झाले भसता मनुष्यास निरनिराळे रोग होतात, व यांच्या प्रमाणावर मनुष्याचा स्वभाव अवलंबून आहे अशी समजूत आहे,त्याचप्रमाणे यूरोप खंडांत प्राचीन व मध्ययुगीन कालांत तेथील यांची अशीच समजूत होती. त्यांच्या समजुतीप्रमाणे blood (रक्त), phlegm (कफ), choler (पिस), व melancholy (कृष्णपित्त) असे चार धातु मनुष्याचे शरीरांत आहेत व या चार धातूंच्या प्रमाणावर मनुष्यस्वभाव अवलंबून आहे.] n. the moisture or fluids of animal bodies (मनुष्याच्या शरीरांतील) दोष m, धातु m, रस m. [THE THREE HUMOURS ACCORDING TO THE AYURVEDIC SYSTEM ARE : कफ, पित्त AND बात. (PHLEGM, BILE OR CHOLER, AND WIND.) THE HUMOURS ACCORDING TO THE ANCIENT GREEK SYSTEM ARE PHLEGM, CHOLER, BLACK CHOLER OR MELANCHOLY, AND BLOOD. DISORDER OR VITIATION OF ANY OF THEM दोष m, धातुनाश m. DISORDER OR VITIATION OF THEM ALL दोष m, त्रिदोषवायु m, सन्निपात m. DISORDER ASCRIBED TO THE VITIATION OF THE PRLEGM 18 कफविकार OR कफरोग; OF THE H. BILE पित्तविकार OR पित्तरोग; -OF THE H. WIND वातविकार OR वातरोग, वायु. EXCESS OF ANY OF THE THREE H. प्रकोप m, दोषप्रकोप m.] 

२ an animal fluid in an unhealthy state रोगी शरीरातील दोष m, दुष्टधातु m. ३ temporary state of mind or feeling, mood, temper (मनाची) वृत्ति f, भाव m, तब्बेत f,स्वभाव m. (To BE IN THE H. FOR ( करितां) तम्बेत लागणे,करीत ) वत्ति असणे. स्वर -सूर भजणे चाहणे g. of s.]