पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1730

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

करणे, (च्या) डोक्यावर वरवंटा फिरविणे, पिळणे, पिकून काढणे, त्राही त्राही करून सोडणे, &o. ५ (college slang) lo study hard for examinationताड्या m. मारणे -लाधणे, चक m- घोट्या m लावणे, दळणे (fig.), (पुस्तकांचा) कीस काढणे -भूस पाठणे,दळण काढणे.G. v. i. to turn the millstones दळणे, दळण n. करणे.२ to become pulverized by friction दळले जाणे, दळणे. ३ to become polished or sharpened by friction घांसून सफाईदार होणें धार येणे चढणे with ला of s. ४ to grate करकरणे, घरघरणे, करकर घरघर आवाज होणे. ५ to drudge, to study hard (as for examination) काथ्याकूट करणे, डोकेफोड करणे, सक्त मेहनत घेणे, उरस्फोड करणे. G.n. दळण n. २ दळणे n. ३ दळप n.४ (colloq.) hard and uninteresting study घोकंपट्टी/चकु m, ताड्या m, घोव्या m. ५ ( college slang) a hard student दळ्या, घोकंपट्टी करणारा -उरस्फोड करून अभ्यास करणारा विद्यार्थी m, पुस्तकांतील मर्म न जाणता अभ्यास करणारा विद्यार्थी m , घोक्या m. Grinder n. दळणारा, दळ्या, दळणकरी. २ धार लावणारा, पाजवणारा, &c. one of the double teeth used to grind of masticate the food दाढ f. Grind'ing n.दळणे n २ दळण n, दळप n. [G. AND POUNDING -COMPREH. दळणकांडण n, दळाकांडा m. MILL FOR G. जातें . PRICE or COST OF G. दळणावळ f, दळाई f, पिसणावळ f, पिसाई f. G. MILL पिठाची गिरण f गिरणी f.] Grindingly adv. Grind'stone n. सहाण f,शाण m. To hold, put, or bring one's nose to the grindstone to oppress one छळणे, पिडणे, गांजणे,&c.

Grip (grip ) [ See Gripe v. t. below.] n. an energetic or tenacious grasp घट्ट मिठी f, मूठ f, मगर मिठी  f. २ a peculiar mode of clasping the hands by which members of a secret association recognize or greet one another (कोणत्याही गुप्तमंडळांतील व्यक्तींची परस्परांस ओळख पटण्यासाठी ठरविलेले) साकतिक हस्तपीडन n; as, " A masonic G." ३ a handle or gripe मूठ f, दांडा m, &c. G. v.t . to gripe which see. Gripper n. मुठीत धरणारा. २.pl. ( in printing presses) the fingers or nippers बोटें n. pl., चिमटे m. pl.
Gripe (grip) [ A. S. gripan, Ger. greifen, Sk. ग्रह,to seize. To gripe is to grasp with a squeeze or pinch, and it is a voluntary action.v.t. to clasp. closely with the fingers, to clutch (पिळवटल्यासारखे चिमट्यांत धरल्यासारखें) मुठीत कबज्यांत -चिकाटींत &c. धरणे, धरणे, पकडणे. २ to seize and hold fast घट्ट मजबूत धरून ठेवणे, गच्च बळकट पकडणे. ३ to pinch, to distress चिमटा काढणे घेणे, त्रास देणे, संकटांत पाडणे. ४ (specifically) to cause pinching pain to the bowels of पोटांत मुरडा m -तिडीक f शूळ m &c. करणे.G.v.i. to clutch, hold, or pinch a things esp. money, with a gripe (कोणतीही वस्तु) मुठीत घट्ट