पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1650

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊन उभ्या खांबाच्या हाताला लटकत ठेवणे, वधस्तंभावर चढवणे. २ to expose to infamy, to blacken काळोखी f. लावणे, काळिमा m-डाग m. लावणे, (सार्वजनिक रीतीने ) पुरी बदनामी करणे; as, " He is gibbetted in the Times. " Gibbon (gib'-bon ) [ Fr. gibbon. ] n. वानरविशेष m. Gibbous (gib-bus ) [ From L. gibbosus, humped -L. gibbus -gibba, a hump, hunch. ] a. swelling by a regular curve. convex फुगीर, फुगीव, फुगाऱ्याचा, फुगोट्याचा, बाह्यगोल, बिंबाकार, न्युग्ज (S.). २ obs. hump-backed पाेंगा, पोंग्या, पोंका, पोक्या, कुबडा. ३ ( astron.) more than a semicircle and less than a circle अर्धाधिक (चंद्र m), अर्धाधिक बिंबाकार. ४ bot. पिशवीसारखा. Gibbose' a. protuberant ( said of a surface ) फुगीर, उंचवट्याचा, &c. Gib'bously adv. Gib'bousness, Gibbos'ity n. फुगोटा m, फुगोटेपणा m, फुगीरपणा m, &c. उंचवटेपणा m, बाह्यगोलता f. २ पोंक n, कुबडेपणा m, ३ अर्धाधिकता f. Gibbose. See under Gibbous. Gibe (jib )[ Of imitative origin. Icel. geipa, to talk nonsense. ] v. i. to sneer, lo scoff, to rail निंदणे, निर्भसणे, हेटाळणे, निंदा f-निर्भत्सेना f टवाळी f. &c. करणे. G. V. t to flout, to address with scoffs and sneers (-ची) निंदा f-निर्भर्त्सना f -टवाळी f, चेष्टा f &c. करणे. G. n. निंदा f, निर्भर्त्सना f, हेटाळणी f, टवाळी f, टवाळकी f, चेष्टा f, कुचेष्टा f, थट्टा f, &c. Gibed' p. t. Gib'er n. Gib'ing pr. p. & v. n. Gib'ingly adv. कुचेष्टेनें. Giblets (jiblets) [ O. Fr. gibelet. ] n. pl. ( rarely sing. ) the internal eatable parts of a fowl (heart) gizzard, liver, &c.) पक्ष्यांचा (काळीज, यकृत् इत्यादि ) खाण्यासारखा भाग m. Giddy ( gid'-di ) [M. E. gidi, gedy. Late A. S. gidig, insane. ) a. dizzy, light-headed घेरी -भोंवळ -भोवंड -चक्कर आलेला, डोके फिरलेला, विश्रांत. [To BE or BECOME G. (चे) कपाळ -डोके भोवणे -फिरणे, तिरमिरणे. ] २ promoting or inducing giddiness भोंवड येण्याजोगी आणण्याजोगी -आणणारी, मस्तक फिरविणारी. ३ running round with celerity, whirling खूब जोराने वाटोळा फिरणारा, चक्कर मारणारा -घालणारा. ४ thoughtless, wild, heedless अविचारी, विचारशून्य, विचाररहित, अविवेकी, विवेकरहित-शून्य, अविमृश्यकारी. ५ unstable, fickle चंचल, छिछोर or चिचोर, अस्थिर. G. V.i. (भोंवऱ्याप्रमाणे) वाटाेळे फिरणे. Gid'dily adv. Gidd'iness n. घेरी f, चक्कर f, भोंवळ f, भ्रम m, तिरमिरी f. २ चांचल्य n, चंचलता f, अविचारीपणा m. Gid'dy -head n. (colloq.) a person without thoughtfulness, prudence and judgment अविचारी मनुष्य, विचारशून्य मनुष्य. Giddier, comp. Giddiest, superb.