पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1648

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

beyond it." To G. clear to be released मुक्त होणे, मुक्ति करून घेणे, मुक्ति पावणे, मोकळा होणे, (संकट, भय, अटक, इ. कांतून ) बाहेर पडणे, सुटणे, सुखरूप निघणे. To G. forward पुढे मजल मारणे. To G. home घरी पोचणे. २ to arrive at one's goal or aim उद्दिष्ट स्थली येऊन पोचणे, नेम साधणे. To G. into (a) to enter (-आंत) जाणे प्रवेश करणे. (b) to pass into, to reach येऊन पोचणे, (-शी ) येऊन प्राप्त होणे. To G. lose or free to disengage one's self (आपली) मुक्तता करून घेणे, सोडवून घेणे, मोकळा होणे. &c. To G. near (-शी) येणे, (-च्या) जवळ येणे जाणे. To G. on पुढे जाणे. २ (-चें) चालणे; as, “ How do you get on.” To G. over (a) to surmount, to overcome ओलांडणे, ओलांडून जाणे, (तून ) पार पडून जाणे. (b) to recoves from ( an injury or calamity ) (-तून) बरा होणे, निभणे, निभावणे, बचणे, बचावणे, पार पडणे, वटावणे. To G. through (a) to pass through ( something) (-च्या मधून) निघून जाणे. (b) to finish ( what one was doing ) संपवणे, पूर्ण -पुरे करणे, तडीस नेणे -लावणे. To G. up (a) to rise (as from bed) (झोपेतून) उठणे, जागे होणे. (b) to ascend, to climb (a) चढणे. Get n. progeny प्रजा f, संतान n, उत्पत्ति f. G. -penny n. (colloq. ) a- successful affair फायदेशीर धंदा m, फत्ते काम n. Get'ter n. Get'ter-up n. ( colloq.) तयार करणारा, बनवणारा, उपस्थित चालू-सुरू इ० करणारा. Get'ting pr. p. and v. n. the act. मिळवणे n, &c. २ acquisition फायदा m, मिळकत f, &c. Get up n. ( colloq.) make-up, style बनावट f, पद्धत f, तऱ्हा f, रचणी f, रचना f, &c. Got pa. t. Got'ten pa. p. Geyser (gi-sér ) [ Icel. geysa. to gush. ] n. a boiling spring कढत पाण्याचा झरा m, उन्हाळें n. Ghastly (gist'-li) [M. E. gastly. Formed from M. E. gasten, A. S. gaesten, to terrify. ] a. like a ghost in appearance, pale, dismal प्रेतकळा आलेला, मुड- (र)द्यासारखा, प्रेतकळेचा, मढेकळेचा, प्रेतच्छायेचा, भुता सारखा, प्रेत-मृतवत्, भेसुर, फिक्का, विवर्ण (S.). २ horrible, shocking, dreadful भयंकर, विकाळ, क्रुर, भयानक, बिकट. Ghast'fully adv. Ghast'ly adv. Ghast'liness n. मढेकळा f, प्रेतकळा f. Ghat, Ghaut (ghawt) [Hind. ghat, (घाट) a passage or gateway.] n. a pass through a mountain डोंगरांतील -पर्वतांतील वाट.f-मार्ग m, घाट m. २ a range of mountains पर्वतांची रांग f-ओळ f, घाट m. ३ stairs descending to a river (नदीला, तलावाला,इ बांधलेला) घाट m, (नदीत, इ.) उतरण्याकरितां केलेल्या पायऱ्या f. pl, घाट m.. Ghee (ghē) [The Indian name.] n. तूप n, घी n.(Guj.) Ghost ( göst) [ A. S. gast; Ger. geist. Of uncertain origin; perhaps allied to Icel. geisa, to race / like