पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1629

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

though articles of clothing, would hardly be called Garments. " Smith. Garner ( gär-'ner ) [ O. Fr. gernier, variant of grenier -L. granarium, granary, -L. granum, corn.] n. a granary धान्यागार n, (धान्याचा) हडपा m, कोठी f, कोठार n. G. V. t. कोठांत कोठारांत ठेवणे, सांठवणें -सांठवून ठेवणे. Gar'nerage n. कोठी f. Garnet (gar'-net ) [ O. Fr. grenat -L. granatum pomegranate, or L. granum, grain, seed.] n. a precious store resembling the grains or seeds of pomegranate चुनडी f. हे रत्न उत्तम डाळिंबाच्या दाण्यासारखें लाल रंगाचे असते. लालडी is a kind of garnet. Garnet is not याकूत which is amethyst. Garnish (gar'-nish) [O. Fr. garniss-, warnis-, stem of pr. p. of garnir; See Garner.] v. t. to decorate, to adorn सजविणे, सजवणे, साजरा -सुशोभित करणे. २ (cookery) to ornament (a dish ) with something laid about it (शोभेकरितां) सभोवताली शृंगारणे. ३ to furnish, to supply पुरवणें, पुरवठा करणे. ४ (law) to give notice to (-ला) सूचना करणे -नोटीस काढणे -लावणे -देणे. G. n. decoration आरास m. or f, शोभा f. २ (also) showy dress or garments भपक्याचा पोपाख n, थाटमाटाचे कपडे m. pl. ३ (cookery) something set round a dish as an embellishment (साहेब लोकांत) पक्वान्नांच्या भांड्यांसभोवताली शोभेकरितां लावलेला शृंगार m, (ताटा-) भोवतालची शोभा f. Garret (gar'et) [O. Fr. garite, -Fr. guerite, a place of safety, watch-tower-O. Fr. garir, to save,-Fr. gaerir, to cure. या शब्दाचा मूळ अर्थ 'उंच शिखर, मनोरा,' असा आहे.] n. an attic (घराच्या) छपराखालचा माळा m, कातरमाळा m, शेवटचे माडीवरची -मजल्यावरची खोली f, माळ्यावरची खोली f, कात्रा m. Garreteer' n. one who lives in a garret कातरमाळ्यावर राहणारा (गरीब) मनुष्य m. २ a poor author, a literary hack: पोटभरू ग्रंथकार, पोटासाठी ग्रंथ लिहिणारा, पैशासाठी लेखकाचा धंदा करणारा. ग्रंथकारांस पैशाच्या अडचणीमुळे कमी भाड्याच्या खोलीत रहावें लागत असल्यामुळे त्यांस हा शब्द लाविण्यांत आला. Garrison (gar'i-sun) [Fr. garnison -garnir, to garnish, to furnish. ] n. mili. (a) a fortified place in which troops are quartered for its security फौजबंद ठाणे n, सैन्याचे ठाणे n, बंदोबस्ताकरिता जेथें फौज ठेवलेली असते असे ठिकाण n, ठाण्याचा -ठाणबंदीचा गांव m : किल्ला m. (b ) a body of troops stationed in a fortified town ठाण्याची शिबंदी f, तट, बंदीच्या ठाण्यांतील लष्कर n.- शिपाई m. pl., किल्याच्या रखवालीस ठेवलेली माणसे n.pl., ठाणबंद फौज f, दुर्गसैन्य n. G. v. t. रक्षवालीच्या शिपायांनी (किल्ला) राखणे, (सैन्याचे) ठाणे बसविणे, (-च्या) रक्षणासाठी फौज ठेवणे -राखणे. Gar'risoned pa. t, & pa. p. Gar'risoning pr. p. &. v. n,