पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1621

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Game ( gām ) [A. S. gamen, play; cog. with Icel. gaman, mirth, joy. ] n. sport of any kind, frolic, play खेळ m, क्रीडा f, मजा f, गम्मत f, रमत f, कौतुक n (!). २ (obs. ).jest थट्टा f, मस्करी f, खेळ m, गंमत f, विलास m, मजा f, चेष्टा f. [ To MAKE G. OF to mock, to ridicule (ची ) थट्टा -मस्करी करणे, (ला) बनवणे. ] ३ a contest, physical or mental (according to certain rules, for amusement, recreation, or for winning a stake ) डाव m, खेळ m, रमत f, बाजी f, शर्यत f, सरत f. ४ a single contest डाव m, खेळ m, बाजी f. [ FULL G. (lit. & fig.) भरडाव m. LOSING G. उतारबाजी f. ] ५ that which is gained, as the stake in a game जितीची अट f, जितीची वस्तु f. ६ ( also ) the number of points necessary to be scored in order to win a game सरशी होण्यापुरती ( पत्त्याचे किंवा गंजिफांचे डावांतील) गुणसंख्या f, (बिझिकचे) मार्क -गुण m. pl. ७ ( card-playing, in some games ) a point credited on the score to the player whose cards count up the highest ज्याचे हात सर्वात जास्त झाले असतील त्यांचे नांवावर चढविण्याचे गुण m. pl., सर्वांत ज्यास्त हात होण्याबद्दल गुण m. pl. ( ? ). ८ method of procedure, plan, Project ठरवून ठेवलेला डाव m (fig.), शिकार f (fig.), (कोणतेही काम करण्याची) आंखून ठेवलेली रेषा f, (योजलेली) कल्पना f, घाट m, धोरण n, युक्ति f, क्लूप्ति f, उद्देश m, मतलब m. ९ animals pursued. and taken by sportsmers पारधीची ‘मृगयेची शिकारीची जनावरें m. pl. -प्राणी m. pl., पारध f, शिकार f. G.v.i. to play at any sport (कोणताही खेळ) खेळणे, (शर्यत जिंकण्याच्या उद्देशाने किंवा इनाम मिळविण्यासाठी) खेळणे. २ to gamble जुगारीने खेळणे, पैज लावून खेळणे, पैसे लावून खेळणे. G. a. plucky, ready to fight to the last हिंमतवान्, धाडसी, बहाद्दर, शूर, वीर, दृढ, शिकस्त करणारा, (हाती घेतलेले काम तडीस नेतांना) प्राणाचीही पर्वा न बाळगणारा करणारा ; as, “I was game ...... I felt that I could have fought even to the death. " २ of, or pertaining to, such animals as are hunted for game, or to the act or practice of hunting शिकारीच्या प्राण्यासंबंधी. (b) शिकारीसंबंधी. A G. at chess बुद्धिबलाचा खेळ m -डाव m, बुद्धिबलक्रीडा f. To make G. of (Milton) See under G. n. २ To make a G. of to play with real skill or energy कसून खेळणे, खेळण्यांत शिकस्त करणे. To die G. to maintain a bold, unyielding spirit to the last मरेपर्यंत टक्कर मारणे -देणे, शेवटपर्यंत हार f कच f. न खाणे माघार f. न घेणे, पाठ न दाखवणे, हातावर शीर घेऊन लढणे. To be G. (a) to show a brave unyielding spirit कोणास वश -आधीन व्हावयाचे नाही असा आव आणणे घालणे, कोणास न नमणे. (b) खेळांत विजयी होणे 'सरशी पावणे, खेळ m 'डाव m- इ० जिंकणे. Game-