पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1599

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

-tinguishment of the debt of a government, or of a corporation, by the accumulation of interest व्याजांतून कर्ज फेडता यावे अशासाठी सरकाराने किंवा सार्वजनिक संस्थांनी व्याजी लावलेली रक्कम f, ऋणविमोचकनिधि m. F. V. t. to provide a permanent revenue (कायमचा) निधि तयार करणे, फंड उभारणे, फंड काढणे, फंड जमविणे. २ to place in a find, as money निधिरूपाने ठेवणे, फंडांत भरणे -घालणें जमा करणे. 3 to put into the form of bonds or stocks bearing regular interest बैठी ठेव करणे, नियमित व्याजाच्या फंडांत किंवा कायमच्या ठेवींत टाकणे; as, "To F. the floating debt.” Fund'able a. convertible into bonds बैठ्या ठेवींत ठेवता येण्याजोगा. Fund'ed a. बैठ्या ठेवीच्या रूपाने ठेवलेला, बैठ्या ठेवींत ठेवलेला, फंडांत ठेवलेला. Fund'-holder n. बैठीठेववाला, कायमच्या सार्वजनिक ठेवींत पैसे असलेला मनुष्य m. Fund'ing pr. p. Fund'less a. बैठी ठेव कायमचा फंड नसलेला. N. B.:-इंग्लंडांत सरकारी बैठ्या किंवा कायमच्या ठेवीत पसलला पंसा परत मिळत नाहीं; फक्त त्याचे व्याज मात्र मिळते. Fundament (fun-da-ment) [ M. E. fundement -O. Fr. fondement, foundation.] n. the part of the body on which one sits, ( specif., anat. ) the anus गांड f, गुदप्रदेश m, अधोदेश m, अधःप्रदेश m, अधाभाग m, मलद्वार n. Fundament'al a. pertaining to the foundation मूलविषयक -संबंधीं. २ ( hence ) essential, as an element, principle, or law आधारभूत, मूलभूत, अवश्यक, जरूरीचें, महत्वाचे, मुख्य, प्रमुख, प्रधान: as, "A F. truth. " F. n. a reading or primary principle, rule, law or article, which serves as the groundwork of a system मूलभूतविषय m, मूलभूत गोष्ट f, प्रधान मूल तत्व n. Fundament'ally adv. मूळापासून, मूळांत. Funeral (fu'ner-al ) [ O. Fr., -L. L. funeralis--L. funus, funeris, & funeral procession.] n.. obsequies, burial (formerly used in the pl.) अतसंस्कार m, शवसंस्कार m, उत्तरविधि m, प्रेतक्रिया f, अंत्यविधि m, और्ध्वदेहिक n, &c. २ the procession attending the burial of the dead प्रेतयात्रा f; स्मशानयात्रा f, शवयात्रा f, मसणबोळावा m. F. a. pertaining to funeral क्रियाकर्मान्तराचा. उत्तरकर्माचा. प्रेतकर्मसंबंधी, उत्तरक्रियेसंबंधी, उत्तरक्रियाविषयक, और्ध्वदेहिक. [ A F. PILE चिता f. ASCENDING THE F. PILE चित्तारोहण n. BURSTING OF THE SKULL OF CORPSE ON THE F. PALE कपाळमोक्ष m. F. ASHES चित्तभस्म n. F. FIRE चित्ताग्नि m. F. FIRE ACCOMPANIED BY THE PROPER RITES मंत्राग्नि m. F. RITE, RITES AND CEREMONIES क्रिया f, क्रियाकर्मोतर n, प्रेतकर्म n, प्रेतकार्य n, उत्तरक्रिया f. THE OFFICIATING BRAHMAN AT F. RITES दर्भ्या n, कारटा m (?), स्मशानातला भट m. UNHALLOWED F. FIRE भडाग f, भडाग्न f, गडाग्नि m.] Fu'neral or Funereal ( Fune-renl ) a.