पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1585

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

F. v. t. to oppose face to face (समोरासमोर) सामना देणे-करणे, समोर उभे राहणे, (समोर उभे राहून) प्रतिबंध करणे, तोंड देणे. २ to appear before, to meet (च्या) पुढे येणे, दिसणे in. con. with or of o., समोर येणे, भेटणे in. con. with ला of o., आढळणे in. con. with ला of o. ३ to confront सम्मुख होणे, कडे तोंड करून समोर असणे; as, "The house F.s the street." ४ to adorn in front समोरची बाजू शृंगारणे, दर्शनी भाग साजरा करणें -नटवणें, डोक्यावर किंवा कपाळावर अलंकार घालणे, शिर भूषविणे. F.v.i. to turn the face or front in any direction कडे तोंड करणे -फिरविणे वळविणे. Front'age n. extent of front समोरच्या भागाचा दर्शनी भागाचा विस्तार m. २ the front part of an edifice or lot इमारतीचा दर्शनी भाग m. Fron'tal a. belonging to the front part समोरच्या भागाचा, दर्शनी. २ anat. of or pertaining to the forehead or the anterior part of the roof of the brain case (मगजपेटीच्या) छपराचा -कपाळाचा, कपालास्थिसंबंधी, (मस्तिष्कावरणाच्या किंवा कपाळाच्या) कवटीच्या वरच्या भागासंबंधी. F. n. a frontlet; as, (a) an Ornamental band. for the hair केस बांधण्याचा नकशीदार पट्टा m. (b) mil. the metal face-guard of a soldier (लष्करी शिपायाची) तोंडावर घालण्याची धातूची टोपी f, शिरस्त्राण n, मुखत्राण n तोडावरील जिरेटोप m. २ arch. a little pediment over a door or window (दरवाजा किंवा खिडकी यांच्यावरील) पुढच्या बाजूची नकशी f, नकसकाम n. ३ eccl, a moveable decorative member in metal, carved wood, or, commonly, in rich stuff or in embroidery, covering the front of an altar (Frontals are usually changed according to the different seasons) (रोमन कॅथोलिक देवळांत स्थंडिलासभोवती घालण्याची) नकशीची. दर्शनी पट्टी f. ४ anat. the frontal bone, or one of the two frontal bones of the cranium कपालास्थि n. Fron'ted a formed with a front, drawn up in a line रांगा धरून उभा राहिलेला; as, "F. brigades." Front'let n. a frontal कपाळपट्टी f. २ (Rare and poetic ) a frown (likened to a frontlet). कपाळास घातलेली आंठी f. Frontier (fron'-těr ) [ O. Fr. frontiere, Fr. frontiere -L. frons.] n. the border, or extreme part of a country, bordering on another country, the marches सरहद्द f, सीमा f, शींव f, प्रांतभाग m, कड f, कडा f. [F. district कड or कडेमहाल m, कडप्रांत m.] F. a. conterminous शींवेवरील, दोन देशांच्या एकमेकांस लागणाऱ्या टोंकाकडील. २ of, or relating to a frontier सीमेचा -संबंधी, सिंवेचा, शिंवेचा. Fron'tiers-man n. living on the frontier सिंवेवरचा-शिंवेवर राहणारा मनुष्य m, शिंवकरी.