पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1565

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुणन n. NUMERATOR OF A F. अपूर्णांकाचा अंश m-भाज्य m. PROPER F. सम अपूर्णांक m, सूक्ष्मभिन्नसंख्या f; जसें, २/५ . REDUCTION OF F.s To A COMMON DENOMINATOR अपूर्णांकांचा समच्छेद करणे n. REDUCTION TO A LOWER DENOMINATOR अपवर्तन n. (?). SIMPLE F. भागजाति अपूर्णांक m; जसें, २/५, १४/११. SQUARE OF A F. अपूर्णांकाचा वर्ग m, भिन्नवर्ग m. ] Frac'tional a. अपूर्णांकाचा, अपूर्णांकासंबंधीं. २ constituting a fraction. अपूर्णीकरूप, अपूर्णाकघटित. ३ insignificant, relatively small हिशोबांत -जमेंत न घेण्यासारखा, बारिकसारिक, अगदीच लहान -थोडा. Frac'tionally adv. अपूर्णीकरूपानें, भागरूपानें, भागशः. Frac'tionate v.t. to separate into different portions or fractions as in the distillation of liquids निरनिराळे भाग-अंश पाडणे. Fractious (frak'-shus) [See Fraction.] a. apt to break into a passion, unruly, apt to scold रागीट, लवकर राग येणारा, तुडस, तुसडा, तुटक, तुटसाळ, बेफाम, कज्जेखोर, कज्जेदलाल, भांडखोर. Frac'tiously adv. भांडखोरपणाने. Frac'tiousness n. तुडस स्वभाव, तुसडा स्वभाव m, तुडसपणा-तुसडपणा m. Fracture (frak'-tur) [See Fraction. ] n. rupture, breach फूट f, भंग m, भंजन n, फट f, फाट f, चीर f. चुराडा m. २ (surg.) the breaking of a bone अस्थिछेद m, अस्थिभंग m. [ COMMINUTED F. (A FRACTURE IN WHICH THE BONE IS BROKEN INTO SEVERAL PARTS ) (ज्या भंगांत हाड मोडून त्याचे दोहोंहून अधिक तुकडे होतात असा) अनेक खंडांचा अस्थिभंग m. COMPLICATED F. (A FRACTURE OF THE BONE COMBINED WITH THE LESION OF SOME ARTERY OR JOINT) (ज्या भंगांत हाड मोडून त्याच्या मोडक्या टोकांनी स्नायू, धमन्या, ज्ञानतंतू, मेंदू, यकृत, प्लीहा, वगैरे शरीराचे महत्वाचे भाग जखमी होतात असा) गुंतागुंतीचा अस्थिभंग m. COMPOUND F. (A FRACTURE IN WHICH THERE IS AN OPEN WOUND FROM THE SURFACE DOWN TO THE FRACTURE ) ( ज्या भंगांत हाड मोडतें व आणखी हाडाच्या मोडलेल्या टोकांशी हवेस जाऊ देण्यासारखी कातडी व मांस यांस जखम झालेली असते किंवा त्या जखमेतून मोडलेल्या हाडाचे टोक बाहेर आलेले असते असा) मिश्र अस्थिभंग m. SIMPLE F. (A FRACTURE IN WHICH THE BONE ONLY IS ŘUPTURED) (ज्या भंगांत फक्त हाड मोडतें व दुसरी फारशी इजा झालेली नसते असा) साधा अस्थिभंग m.] ३ (min.) the texture of a freshly broken surface तडक f, चीर f, भेगाळपणा m. F. V.t. to break asunder छेद m -भंग m. करणे, मोडणे, तोडणे, चुरा m-चुराडा m. करणे, तुकडे तुकडे छिन्नविच्छिन्न करणे, तडकणे, चीर f. -पाडणे. Fragile (fraj-il) [ Fr. fragile, L. fragilis, easily broken -L. frag, base of frangere, to break. ] a. easily broken, brittle, delicate ठिसुळ, लवकर फुटणारा, नाजुक, भंगशील, भंजनशील, फुटरा, फुटीर, कांचेच्या भांड्यासारखा, अशक्त. २ frail क्षणभंगुर,