पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1551

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(b) to train शिकवून तरबेज -तयार करणे. (c) to arrange रचणे, बांधणे, रचना f -रचणूक f, बंदोबस्त m. &c. करणे g. of o. ३ to go to make up, to be the essential or constituent elements ( said of that out of which anything is formed, in whole or in part) अंगभूत -अवयवभूत &c. असणे in con., बनवणे; as, "Who formed by far the majority." (These constructions in English can best be translated into Marathi by in. con.) ४ to provide with a form (as a hare ) (See F. n. ९) सशाला राहण्यास जागा देणे. ५ gram. to derive by grammatical rules, as by adding the proper suffixes and affixes (व्याकरणाचे नियम लावून रूपे) तयार करणे. F. v. i. to mute a form विशेष आकाराने-रूपाने राहणे; as, "The infantry should form in columns." २ to run for a form, as a hare (सशाने) आश्रयस्थान पकडण्याकरितां धांवणे -पळणे. For'mal a. belonging to the form आकाराचा, रूपाचा, आकृतीचा. २ constituent, essential अंगभूत, सहज, स्वाभाविक, स्वरूपात्मक. ३ done in due form, or with solemnity; ceremonial express यथाविधी, बेताचा, बेतीव, कायदेशीर, यस्थापद्धति, यथामार्ग, आचारशुद्ध, संप्रदायशुद्ध, सवे सोहळे करून (केलेला), व्यवहारानुरूप, आचारानुरूप, विध्यनुरूप. ४ regular, stiff, exact, methodical, ceremonious आदरोपचारी, आदरोपचाराचा, आदरोपचारनिष्ठ, आदरसत्कारी, औपचारिक, बेतबेताचा, ठरीव पद्धतीच्या बाहेर काडीभर न जाणारा. ५ having the form or appearance without the substance or essence बाहेरचा, बाहेरच्या डौलाचा, वरवरचा, बाह्यात्काराचा - दिखाऊ, वरवर केलेला, तात्पुरता, चालचलाऊ, कामापुरता, वरकांती केलेला, नमुना म्हणून केलेला. ६ conventional विध्यनुरूप, रूढ झालेला, ठरीव, पूर्वापार चालत आलेला, (परंपरागत) परंपरेनें स्थापित केलेला. ७ (obs.) (Shakes.) sound, normal ताळ्यावर असलेला, सुस्थितीतील. ८ log. concerned with the form ( as distinguished from the matter ) of reasoning (तर्क करण्याच्या) प्रकाराचे किंवा रुढींचें प्रतिपादन करणारे (तर्कशास्त्र), रूढिप्रतिपादक, प्रकार प्रतिपादक, रूढ्यात्मक, प्रकारात्मक, वाक्यात्मक. [वाक्य =syllogism. F. logic वाक्यात्मक तर्कशास्त्र n, रूढ्यात्मक-प्रकारात्मक-रुढिप्रतिपादक-प्रकारप्रतिपादक तर्कशास्त्र n.] Form' alise 'V. t. to give formal or definite shape to विशेष रूप n, यथाविधि रूप देणे. २ to render formal कायदेशीर-पद्धतशीर-यथाविधि करणे. F.v.i. to act with formality शिष्टाचाराच्या कवाइतीने वागणे. Forma'lism n. the practice or the doctrine of strict adherence to or dependence on, external forms, esp. in matters of religion कर्मठपणा m, मंत्रापेक्षा तंत्राची जास्त आवड f, तंत्रप्रियता f, नियममात्रसेविता f. Forma'list n. one too much confined to forms आचाराकडे अत्यंत लक्ष देणारा, बाह्याचारभक्त m. २