पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घातलेली) स्वारीची तोफ f,चालती तोफ f. Field'-work n. any temporary fortifications thrown up by an army in the field (सैन्यरक्षणासाठी केलेली) तूर्तातूर्तीची तटबंदी f. To keep the F. mili to continue a campaign लढाई चालू ठेवणे.
Fiend (fēnd) [M. E. fend, A. S. fiond, feond lit 'a hating one,' an enemy, the enemy; Sk. पीय , to hate (Fick.). Fiend शब्दाचा मूळ अथ शत्रु असा आहे, परंतु तो अर्थ आतां लुप्त झाला आहे] n. the arch-enemy of mankind, the devil मनुष्यजातीचा बिलंदर शत्रृ m, सैतान n. २ an evil spirit generally, a demon, a devil, a diabolical being सैतान n, पिशाच n, भूत n, वेताळ m, असुर m, राक्षस m. ३ a person of superhuman wickedness पातशय दुष्ट मनुष्य m, सैतानी स्वभावाचा मनुष्य m.४ an implacable or malicious foe सैतानसारखा -पिशाचासारखा शत्रु m, अतिदारुण -तिक्रूर शत्रु m. ५ a person or agency causing mischief annoyance नुकसान करणारा किंवा त्रास देणारा मनुष्य m, किंवा इतर साधन n. Fiendish a. infernal, Cent, wicked सैतानासारखा. अतिदारुण, अतिक्रूर &c. Fiendishness n. सैतानी स्वभाव m, सैतानपणा m, अतिदारुणता f, &c. Fiend' like a. सैतानासारखा, पिशाचासारखा.
Fierce ( fērs )[O. Fr. fers, fiers, - L. ferus, wild, rage.] a furious, violent भयंकर, चंड; as, "F. wind." २ vehement in anger or cruelty, ferocious, उग्र, चंड, जहाल, जालीम, जलाल, कहा, कडक, पारुण, जाज्वल्य, प्रखर, राक्षसी, आसुरी. [ SOME AND PHRASES FOR A FIERCE, FEROCIOU8 MAN ARE यम, यमरूप, यमरूपी, यमस्वरूप, यमदत, कालमूति, लस्वरूप, कालरूप, कालरूपी, कल्पान्तकाल, कृतान्त, काळ ,कृतान्त, प्रलयकाळ, राक्षस, बडे राक्षस, आग्यातार, अकरावा रुद्र, जहरीमोहरा, आवसावरचा वाघ, पचानन, जिता संबध, दैत्यांशी.] ३ excessively earnest eager or ardent अत्यंत उत्सुक, अत्यंत उत्कांठत, तिकडक. Fiercely adv. Fierceness n. भयंकरपणा m, जालीमपणा m, उग्रता f, चंडता f. २ अत्युत्सुकता f.
Fiery (fir'-i or fi'er-i) a. consisting of, containing, or resembling fire विस्तवासारखा, विस्तवाचा, अग्निमय, आगीचा, अग्नीचा, अग्निवत, अग्नियक्त. २ vehement, ardent, impetuous रागीट, उधत, तरतरीत. ३ passionate, irritable तापट or तापड, जहाल, जलाल, तलख, आग्या, उष्ण, खपती. तलखल्या, चंड, खंदा. आसुरी , जाज्वल्य. ४ unrestrained, mettlesome, spirited कन्ह्यात न राहणारा, पाणीदार, तापट. ५ burning hot parched, feverish जळजळीत, जळणारा,करपलेला, ज्वरित. Fierily adv. Fieriness n. अग्नित f, अग्निस्वभाव m, अग्निधर्म m. २ उष्णता f, जहाल f,तलखी f, तलखली f, तापट स्वभाव m, नाकावर राग m. उष्णता f, जळजळीतपणा m.