पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारे. Alms-gate n. सदावतीचा-भिक्षा वांटण्याच्या ग्रहाचा दरवाजा m. Alms-gives. दाता m. Alms giving n. धर्म m, दानधर्म m. Alms-house n. धर्मशाला pop. धर्मसाळ f, धर्मवासगृह n. Alms-man a. भिक्षोपजीवीm, भिक्षुक m,भिक्षाजीवी m, भीक खाणारा m.
Aloe (al'o) n. bot. (plant) alve prfoliata कोरफड f.a. कोरकांडे n, कुंवारकांडे n, कुंवारफोड n, घृतकुमारी pop. कुमारी f, तरुणी f. २-inspissated juice. mal. काळाबोल m, एलियाबोळ m, कोरकांडे n, कोरफड a, कुंवारकांडे n, कुंवारफोट n. Al'oed a. Aloes-wood n. अगरm-n, अगरू m.
Aloft (a-loft') adv. on high उंच, उंची, वर, वरनं. २ naut. ढोलकाठीचे शेंड्यावर, डोलावर.
Alone (al-on') [ All and One.] a. एकटा, एकला, एक एकटा, एकएकला, एकाकी. [To LEAVE OR LET A. सोडणे, सोडून देणे, जाऊ-राहूं-अगू देणे, (च्या) वाटेस न जाणे]. २ without company एकटा, एकटा मात्र; as, He A. remained there. ३ अद्वितीय, अप्रतिस्पर्धी, सर्वश्रेष्ट. Alone adv. एकट्याने, फक्त, मात्र. Alone-liver एकटा रहाणारा. Alone'ness n. एकटेपणा m.
Along (a-long' ) [ of A. S. origin. ] पूर्वी ह्याचा उपयोग विशेषणासारखा करीत असत, परंतु तो उपयोग आतां चाल नाही. A. prep. throngh the whole or entire length of, from end to end of ( whether within, as of a rulley or by the side of; as a river ) अवल अखेर लांबीच्या बाजूनें, दोन्ही शेवट-दोन्ही टोक-दोन्ही अवधिमयसीमा-&c.-धरून-व्यापून-मिळवून, अवल अखेर, पहिल्यापासून-आरंभापासून-शेवटपर्यंत, अहदतहद, gran. (All along-all through the couree of लंबीच्या बाजूनं सर्वभर. २ अथपासून इतिपर्यंत, ययावत् ; as, Christ's design all along the Evangelists ). २ by the length of, in the direction of length, lengthwire (as distinguished from across ), following the line of ( a road, wall, river, sea-shore ).लांबीच्या बाजूनें, उभा (आडवा across नव्हे), लांबीच्या धोरणाने-सूत्रानं. ३ लांबीला समान्तर असा; as, The ship sailed A. the shore at twenty yards from it. ४ बाजूनें; as, A. the shore किनाऱ्याच्या (लांबीच्या) बाजूनें. Along adv. (with by) लांबीच्या धोरणाने, लांबीने, उभा; as, To go A. by the king's high way. २ पुढे, पुढच्या बाजूकडे, प्रगतिदर्शक किंवा उत्कर्पदर्शक रीतीने. [To Get along उत्कर्ष पावणे, भरभराट होणे, पुढे पाऊल पडणें. Get along चल जा, चल निघ, तोंड काळे कर.] Along with, onward with, on the way with, in company with, side by side with बरोबर, सहित, सह, सहवर्तमान, समेत, समवेत. Along of मुळे. Alongshore adv. किनान्याने, किनान्याच्या बाजूनें. Along-shore-men n.pl. गोदीत काम करणारे मजूर m. pl. Along-side adv. जवळून बाजूने, एकमेकांच्या जवळ जवळ; as, To lie A. or A. of