पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हृदयी. २ not obvious or clear, not decided संदिग्ध, संशयात्मक, शंकनीय, भ्रांतिकारक, निकाल-निर्णय न झालेला-लागलेला, उलगडा न पडलेला.३ characterised by ambiguity, dubious संदिग्धार्थ (S.), अव्यक्त (S.), अस्पष्ट, गूढ; as, " A D. phrase." ४ of uncertain issue or event ज्याचा शेवट काय होईल हे खात्रीने सांगतां येत नाही असा, अदृष्टफल, अनिश्चितान्त. ५ (obs. ) fearful, apprehensive, suspicious शंकित, भीत, भ्यालेला. Doubt'fully adv. संशयाने, शंकित होऊन, संशयपूर्वक, शंकेने, शंकित-साशंक वृत्तीने. Doubt'fulness n. शंकित वृत्ति f, बुचकळा m. २ शेवट काय होईल हे न समजणे n. Doubt'ing a. शंकित, साशंक. Doubt'less adv. निःसंशय, खात्रीपूर्वक लायक. ४. निःशंक, शंका-भीतिरहित. Doubt'lessly adv. खचित, नक्की, निश्चयपूर्वक. Douceur (doo-ser' ) [ Fr. douceur', lit. sweetness (hence, pleasant gift).-L. dulcorem, acc. of dulcor, sweetness.-L. dulcis, sweet.] n. sweetness of manner सभ्य वागणूक f, गोड वर्तन n. २ a gift for service done or to be done (काम करून घेण्याकरिता किंवा केल्याबद्दल दिलेली) देणगी f. अगर बक्षीस n, पारितोषिक n. ३ ( sometimes ) a bribe लांच m. Douche ( doosh ) [ Fr. douche, a. shower-bath-It. doccia, a water-pipe-It. docciare, to pour; equivalent to Late L. ductiare-L. ductus -L. ducere, to lead.j n. a current of water or vapour directed upon some part of the body to benefit it medicinally (वैद्यकदृष्ट्या फायदा होण्यासाठी शरीराचे कोणत्याही भागावर सोडलेली) पाण्याची धार f, किंवा (वाफेचा) वाफारा m, अभिषिचन ॥n. २ a douche bath बाप्पस्नान n, वाफारा m, पाण्याने किंवा वाफेच्या उवाऱ्याने शरीर साफ करणे n, योनिमार्ग धुवून-खळबळावून काढणे. ३ med. a syringe पिचकारी f. Dough (do) [M. E. dah, dogh. A. S. düh, Dut. deeg, Dan. deig, Swed. deg, Icel. deig, Goth daigs, a kneaded lump. Cf. Sk. दिह्, to smear. ] n. soft mass of moistened flour or meal, kneaded or unkneaded, but not yet baked भिजवलेले भाकरी वगैरेंचें पीठ n, मळलेली-तिंबवलेली कणीक f, पीठ n. २ anything of the consistency of such paste भिजविलेल्या कणकेसारखा मऊ पदार्थ m. [TO HAVE ONE'S CAKE D. हाती घेतलेल्या कामांत यश न येणे-निराशा होणे, काम फसणे.] Dough-baked a. अर्धवत् भाजलेली, पक्क न झालेली, कञ्ची, हिरवी. २ अर्धे राहिलेले पुरें न झालेलें. ३ (colloq.) जडबुद्धि, मंदबुद्धीचा. Doug-faced a. लवचीक, लवणारा. Dough'iness n. तिंबलेल्या कणकेसारखी स्थिति f. Dough-kneaded a. मऊ, नरम. Dough'y a. भिजलेल्या पिठासार मऊ, नरम, थलथलीत व फिकट. Doughty ( dow'ti) [ M. E. dohti, duhti, valiant. A. S. dohtig, valiant-A. S. dugan, to be worth