पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

of honour or authority खाली फेंकणे-लोटणें-आणणे. (b) अधिकारावरून खाली आणणे, (चा) दर्जा कमी करणे, (उच्च पदावरून) उतरविणे, खाली आणणे. २ to unhorss घोड्यावरून खाली आणणे-पाडणे. ३ (mech.) (यंत्र) खाली उतरणें-घेणे. (b) (यंत्र) सोडणे (as, opposed to जोडणे). ४ (artillery) (तोफखान्याच्या गाड्या मोडून व सामान वगैरे काढून घेऊन) तोफा निकामीनिरुपयोगी करणे. D. v. i. उतरणें, खाली येणे, अवरोहण करणे. २ घोड्यावरून उतरणे. Disobedient ( dis-ő-bē'-di-ent) [L. dis & Obedients] a. neglecting or refusing to obey, refractory अवज्ञा करणारा, हुकूम मोडणारा, बेहुकमी, आज्ञा हुकूम न मानणारा, आज्ञातिक्रमी. २ अनम्र, न जुमानणारा, (चा) अम्मल चालू न देणारा. Dis'obe'dience n. अवज्ञा f, हुकूम मोडणे n, आज्ञोल्लंघन n, आज्ञाभंग m. Dis'obe'diently adv. Disobey ( dis-o-ba')[L.dis, not & Obey.] v. t. to refuse or neglect to obey, to violate command अवज्ञा करणे, आज्ञा f, हुकूम m, मोडणे-तोडणे, आज्ञाभंग m. आज्ञोल्लंघन n. करणे. D.v.i. आज्ञा मानण्याचे नाकारणे. Disoblige (dis-o-blij') [L. dis, the opposite of a Oblige.] v. t. to do an act which contravenes the will or desires of, to displease उपकार न करणे, उपकारी-उपयोगी न पडणे, विरुद्ध वागणे, अनादराने मन दुखविणे, नाखुष करणे, अनुपकाराने-अकृपेने असंतुष्ट करणे. Disobliga'tion n. उपकार न करणे n. २ (R) उपकारांतून-ऋणांतून मुक्त करणे n, उतराई होणे n. Dis'obliga'tory n. Dis'oblige'ment n. Dis'obli'ging a. नाखुष करणारा, &c., कापल्या करांगुळीवर न मुतणारा, अनुपकारी. २ अनुपकारी, उपकार न करणारा. Dis'obli'gingly adv. Dis'obli'gingness n. Disorder (dis-or' der ) [ L. dis & Order.] n. want of order, lack of arrangement, confusion, disarray अव्यवस्था f, गोंधळ m, गैरबंदोबस m, गडबडसडबड f, उलथापालथ f, गाबाळ f, विसकळ f, अस्ताव्य f, खता f, घोटाळा m, भन्नप्रक्रम m, mili व्युहभंग. २. neglect of order or system, irregularity व्यवस्थेची हयगय f, गैरशिस्त f, शिस्त मोडणे n, पद्धत्यतिक्रम m, नियमोल्लंघन n. ३ Breach of public order, disturbance of the peace of society, tumult शांतताभंग m, अस्वस्थता f, गलबल f, धांदल f. ४ disturbance of the functions of the animal ecomony, sickness, derangement शारीरिक व्यापारांत बदल m- अव्यवस्था f. बिघाड m, आजार m, विकृति f, विकार m. D. v. t. to disturb the order of, to derange विसकळणे, अव्यवस्था-उलथापालथ-घालमेल-धांदल करणे. २ to disturb, or interrupt the regular & natural functions Of either (body or mind ), to discompose विकार-विकृति उत्पन्न करणे, व्यथित होणे-करणे-देणे. Disor'dered a विस्कळित, अस्ताव्यस्त, &c. २ विकृत, आजारी Disor'derliness n. अव्यवस्थितपणा m, अव्यवस्था f,