पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1055

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुवा m, दुरी f. [Deuce-ace n. दुफाशी डावांत तिरफळ n, तिनकाणे n] २ टेनिसांत एकाच खेळांत दोन्हीं भिडूंनी तीन टोले मारिले असतां जे मार्क मोजतात ते किंवा "40 all." Deuce ( dūs ) [ Low Ger. de duus ; the deuce Ger. der daus ! Orig. an exclamation on throwing the deuce, or two at dice, as it was a losing throw.-O. Fr. dous, two ( above ).] n. (vulg.) a devil, a demon भूत n, पिशाच n, राक्षस m. (used only in exclamatory or interjectional phrases.) Deuced a. राक्षसी. २ अतिशय. Deucedly adv. अत्यंत. Deuterogamy (dū-tér-og'-a-mi) [Gr. deuteros, second & gamos, marriage. ] n. पहिल्या बायकोच्या किंवा नवऱ्याच्या मरणानंतर केलेला विवाह m, विधवा-विधुरविवाह m, बिजवराचे लग्न n, पुनर्विवाह m, दुसरे लग्न n. द्वितीय संबंध m, द्वितीय विवाह m. Deuterog'amist n. बिजवर m. २ दुसरे लग्न करणारी स्त्री f, पुनर्भू f. Deuteronomy ( dū'-ter-on'-o-mi) [ Late L. deuteronomium-Gr. deuteronomion, a second or the repeated law-Gr. deuteros, second & nomos, law.] n. परमेश्वराने मोझेजला दिलेल्या दहा आज्ञांचा अनुवाद असलेले पेन्टेट्रचचें पांचवें पुस्तक n. Deuteronom'ic-al a. Deuteron'omist n. डयूटरॉनमीचे किंवा अनुवादाचे पुस्तक लिहिणारा ग्रंथकार किंवा अशा ग्रंथकारांपैकी एक. Devaporation (de-vap-ô-rā'-shun) n. the change of vapour into water वाफेचे पाणी होणे n, विबाष्पीभवन n. N. B.-In विवाष्पीभवन, वि signifies the reverse process. Devastate (dev'-as-tat) [L. devastatus pa. p. of devastare-L. de & vastare, to lay waste.] v. t. to lay waste, to ravage उध्वस्त-ओसाड-उजाड करणे, बेचिराख करणे, नासधूस f, धूळदशा f- धूळधाणी f- धूळधाण f. करणे. Devasta'tion n-act. नासधूस f, नासाडी f. करणे n.-state. विध्वंस m, नासधूस f, नासधूळ f, वेराणी f, नासाडी f. २ law. मयताच्या जिंदगीची वहिवाटदाराने नासाडी करणे n. Dev'asta'-ted a. नासधूस केलेला, उजाड. Dev'asta'ting pr. p. Develop (de-vel'-op) [Fr. developper, to unfold; L. de & O. Fr. voloper, to envelop. Develop शब्दाचा मूळ आच्छादन काढून टाकणे असा आहे. व ह्या मूळ अर्थापासून स्पष्ट करणे, प्रगट करणे, पूर्णतेस आणणे, व्यक्त करणे, उत्क्रांती करणे, वाढविणे, विस्तार करणे असे अर्थ आलेले आहेत. v. t. to unfold, to unravel उघड-स्पष्ट करणे, उघडा-व्यक्त-प्रकट करणे. २ to produce or give forth (स्पष्ट रूपाने-दृश्य रूपाने) उत्पन्न करणे, पूर्णतेस आणणे, (ला) पूर्णत्व देणे. ३ to form or expand by process of growth (ची) वृद्धि f- वर्धन n- वाढ f. करणे, प्रगल्भ करणे, विकास करणे, फुलविणे, पूर्ण वाढ करणे, (ची) उत्क्रान्ति करणे, उद्विन्न करणे. ४ to advance, to further, to perfect, to