तरतरी f-किंमत f. कमी करणे. Demoralisa'tion n. नीतिभ्रष्टता f. Demos (de'-mos ) [ Gr.] n. हलक्या वर्गाचे-खालच्या दर्जाचे कनिष्ठ प्रतीचे लोक m. pl. Demo'tic d. लोकांसंबंधी. २ popular, common साधारण, लोकप्रिय. Demulcent ( de-mul-sent ] L. demulcens pr. p. of demulcere-L. demulcere, to stroke, to soothe.] a. softening, mollifying, soothing (जळजळ) शमविणारे, बरे करणारे, मऊ-नरम करणारे, शमक. D. n. सूज कमी करणारे औषध n. Demul'sion. n. शांतवन n. २ ज्याच्या योगाने (रोगाचें) शमन होतें तो पदार्थ m, शामक n, शमक n. Demur ( de-mer' ) [O. Fr. demourer', demeurer, to tarry, to hesitate-L. demorari-L. de, fully & morari, to delay, from mora, delay. ] v. i. (obs. ) to linger', to stay, to tarry कांकू करणे, नानू f. करणे, बुचकुळणे, मागेपुढे करणे. २ law. तकरार f. सांगून थांबणे, तकरार f- हरकत f. घेणे. ३ to take exception आक्षेप घेणे. D., Demur'ring n. stop, pause, scruple कांकू f, आक्षेप m, आशंका f, संदेह m, वितर्क m, विकल्प m. २. पक्षकाराने कायद्याच्या मुद्याने घेतलेली हरकत f. Demur'rable a. हरकत घेण्याजोगा. Demur'rage n. गलबताची खोटी झाल्याबद्दल मालकास दिलेला पैसा m, खुटवा m, नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ स्टेशनांत माल पडून राहिला तर मालकाने कंपनीस दिलेला पैसा m. Demur'rer n. अटकाव करणारा, तकरार करणारा. २ law. कायद्याचा बांधा m. [ D. to evidence पक्षकाराने पुराव्याविरुद्ध घेतलेली हरकत f.] Demure (de-mar' ) [ L. prefix de+ M. E. mure, mature, calm-O. Fr. meur',-L. matures, mature. ] a. of sober and serious mien, grave अतिनम्र, गंभीर. २ affectedly modest, making a short of gravity गोमुख्या, बोकेसन्याशी, भगलभावार्थी, बकध्यानी, ओढून ताणून-विनय दर्शविणारा, ढोंगी, दांभिक, वरवर विनय दाखविणारा. Demure'ly adv. गंभीरपणानें, ढोंगीपणानें. Demure'ness n. बकध्यान n, बोकेसंन्यास m. Demy ( de-mi') [ An Eng. spelling of L. demi. ] n. कागदाचा एक विशिष्ट आकार m. छापण्याचा "डेमाय्" कागद २२ १/2 तसू लांब व १७ १/२ तसू रुंद, लिहिण्याचा २१ तसू लांब व १६ तसू रुंद व चित्रे काढपयाचा २० तसू लांब व १५ तसू रुंद असतो. Demy'ship n. Den (den ) [M. E. den; A. s. denn, a cave.] n. a small cavern or hollow place in the side of hill or among rocks गुहा f, बीळ n. २ a squalid. place of resort, a wretched dwelling-place राहण्याचे घाणेरडे ठिकाण n, भिकारडी-दुराचाराची जागा f. ३ (colloq.) any snug or close retreat where one goes to be alone एकांतवास m, एकांतआश्रम m. D. v. i. गुहेत राहणे. Denary ( dēn-ar-i) [L. denarius, containing ten-L.
पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1021
Appearance