पान:रमानाटक.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५

रमानाटक.

र० – ( रागानें ) कायग मी केलं ?
स० - घरांत चल.
र० - मी नाहीं येत जा.
स० – ( मनाश ) आतां पोरीला काय करावं! रागा- वून जर बोलावं तर आपल्यालाच वाईट वाटतं. एकुलती एक पोर आणखी तिचंही धड नाहीं, तेव्हां तिला तरी बोलून काय उपयोग! ( उघड ) असंग काय करतेस ! घरांत चल.
र० - घरांत काय आहे! मला गडे कर्मत नाहीं ह्न- णून मी इथं उभी राहिले.
स० – काम आहे चल.
२० – ( रागानें ) चल तर चल.(पाय आपटीत निघून जाते व सखूही जाते. )