पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण प्रत्येकास भासूं लागलें. अर्थात् असा डोलारा ढांसळून पडण्यास हजारों कारणें लागत असतात; परंतु त्यावेळेस फ्रान्सची फ्रान्सची खालावलेली सांपत्तिक स्थिति. सांपत्तिक स्थिति बरी असती, तर आणखी कांहीं वर्षे हा डोलारा टिकाव धरून राहिला असता असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु सप्तवार्षिक युद्धानंतर फ्रान्सची सांपत्तिक स्थिति अगदींच खालावली. चवदाव्या लुईच्या महत्त्वाकांक्षी लढायांमुळे फ्रान्सला झालेलें बरेंच कर्ज, १५ व्या लुईच्या अमदानीत बेसुमार वाढलें, व १८ व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या प्रारंभापासून फ्रान्सचा खर्च उत्पन्नाच्या मानानें एकसारखा वाढत गेला. १५ व्या लुईच्या कारकीर्दीत (१७१५- १७७४) नवीन कर्ज काढून खर्च व उत्पन्न यांची कशीतरी तोंड- मिळवणी करण्यांत येत असे. परंतु राष्ट्राचें कर्ज अशारीतीनें एकसारखें वाढत चालल्यामुळे कोणती तरी महत्त्वाची सुधारणा केल्याखेरीज राष्ट्राची : धगडत लागणार नाहीं असें विचारी लोकांस स्पष्ट दिसूं लागलें ! १५ व्या लुईनंतर त्याचा नातू १६ वा लुई ( १७७४-१७९२ ) गादीवर आला तेव्हां तो केवळ वीस वर्षांचाच होता. त्याची पत्नी मोरिया अॅन्टोने देखील आपल्या पतीप्रमाणेंच अल्पवयी होती. आपल्या देशाची स्थिति सुधारावी, व गरीब, गांजलेल्या लोकांस मदत करावी अशी दोघांची इच्छा होती. परंतु आपल्या इच्छेप्रमाणें घडवून आणण्याचे सामर्थ्य मात्र राजा व राज्ञी यांच्या अंगीं नव्हतें ! सोळावा लुई गादीवर आला त्या दिवसापासून फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या दिवसांपर्यंत एकंदर पंधरा वर्षे - उत्पन्न व खर्च यांची तोंडमिळवणी कशी करावी याच विवंचनेंत गेलीं ! खर्च व उत्पन्न यांची तोंडमिळवणी करण्यास दोनच उपाय होते, व ते उपाय म्हणजे दरबारचा बेसुमार वाढलेला खर्च कमी करणें, व विशिष्ट हक्क असलेल्या अमीर उमराव व धर्माधिकारी यांनी आपले हक्क, फ्रान्सची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचे प्रयत्न. सोडून इतर लोकांप्रमाणें कर देण्यास तयार होणें; हेंच होत ! तेव्हां या सर्व गोष्टींचा विचार करून कांहीं सुधारणा घडवून आणण्यासाठीं लुईनें आपल्या प्रधानमंडळांत कांहीं प्रमुख माणसें घेतली. लुईच्या या नवीन प्रधानमंडळांत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ट