पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १७०६ मध्ये नेदर्लंडमधील रॅमलीज या ठिकाणीं मार्लबरोस दुसरा एक मोठा जय मिळाला व इकडे राजपुत्र यूजेन त्यानें ट्यूरीननजीक फ्रेंच सैन्याचा पराभव करून त्यास संयुक्त . सैन्याचा जय. इटलीमधून हांकून लावलें. अशाप्रकारें संयुक्त सैन्यास एक सारखा जय मिळत असतां १७०८ व १७०९ मध्यें औनर्डे व माल्पाक्के या दोन ठिकाणीं फ्रेंच सैन्याचा पुरता फडशा उडून संयुक्त सैन्यास खुद्द पॅरिसवर चालून जातां येणें देखील शक्य झालें. अशाप्रकारें मार्लबरोच्या विजयामुळें फ्रान्सचा पुरता फडशा पडून फ्रेंच राष्ट्र पुरतेपणीं शरण येईलसा सुमार इंग्लंडमधील प्रधानमंडळ बदलते. दिसत असतां, मार्लबरोला प्रोत्साहन देणाऱ्या इंग्लंडमधील विग प्रधानमंडळाचा पाडाव होऊन शांततावादी टोरी पक्षाच्या प्रधानमंडळानें राज्यकार- भाराचीं सर्व सूत्रे आपल्या हातीं घेतल्यामुळे मार्लबरोची स्थिति फारच चमत्कारिक झाली ! बादशाहा जोसेफ मरण पावतो - १७११. इकडे १७११ मध्यें पवित्र रोमन साम्राज्याचा बादशहा जोसेफ मरण पावून त्याच्यानंतर त्याचा भाऊ ६ वा चार्लस याचीच बादशाही पदावर नेमणूक झालेली होती. स्पेनच्या गादीवर उमेदवार म्हणून हाच चार्लस असल्यानें त्यास स्पेनची गादी मिळाल्यास आस्ट्रिया व स्पेन हीं राज्यें एकत्र होऊन हॅप्सबर्ग घराण्याची सत्ता युरोपमध्यें अमर्यादित होईल अशी भीति वाटल्यानें, चार्लसचा पक्ष घेऊन १४ व्या लुईशीं युद्ध करण्यांत इंग्लंडचा कांहींच फायदा नव्हता. तेव्हां हें युद्ध लवकरच तह करून थांबवावें असें साहजिकच इंग्लिश प्रधानमंडळास वाहूं लागलें. तसेंच या युद्धांत एकसारखे पराभव खावे लागल्यानें, १४ वा लुईही जेरीस येऊन तह करण्यास कबूल झाला. तेव्हां १७१३ मध्ये युट्रेक्ट येथें तह करून हें युद्ध थांबविण्यांत आलें.