पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण जेम्सच्या मनांत येत नाहीं हें पाहतांच त्या पंथांतील कांहीं लोकांनीं जेम्स व प्रॉटेस्टंट पार्लमेंट यांचा नाश करून टाकण्यासाठीं "एक भयंकर कट रचला ! राजा व पार्लमेंटमधील सभासद यांचा नाश करून टाकण्यासाठीं त्यांनी पार्लमेंटगृहाच्या खालील तळघर भाड्यानें घेऊन त्यांत बंदुकीची दारू भरली. ५ नोव्हेंबर १६०५ मध्यें - पार्ल- मेंटसभेची बैठक उघडण्याच्याच दिवशीं - खालील दारूच्या कोठारास आग लावून पार्लमेंटसभेची बैठक सुरू असतां पार्लमेंटगृह उडवून टाक- याचें कटवाल्या मंडळींनी ठरविलें होतें. परंतु या कटवाल्यांपैकी एकानें •लॉडांच्या सभेंत असलेल्या आपल्या एका मित्रास त्या दिवशीं पार्लमेंट- सभेच्या बैठकीस न जाण्याविषयींची संदिग्ध सूचना दिली असल्यामुळें, साहजिकच संशय उत्पन्न हेऊन, पार्लमेंट सभागृह तपासण्यांत आलें ! या वेळीं खालील तळघरांतील बंदुकीच्या दारूवर देखरेख करून आपलें भयंकर कृत्य तडीस नेण्यास तत्पर असलेल्या गाय फॉक्स व त्याचे साथी- दार यांना एकदम पकडण्यांत येऊन त्या दिवशीं घडून येणारा भयंकर अनर्थपात टळला ! रोमन कॅथलीक पंथीय लोकांच्या या कृत्यानें तर, पूर्वीपासून त्यांच्याबद्दल वाटत असलेला तिटकारा अधिक दृढ होऊन त्यांना देण्यांत आलेल्या थोड्याफार सवलतीही यानंतर काढून घेण्यांत आल्या ! अशाप्रकारें गादीवर येऊन दोन वर्षे झालीं नाहींत तोंच प्युरटिन- पंथीय लोक, त्याचप्रमाणें कॅथलीक पंथाचे अनुयायी आपापल्या परी जेम्सचा द्वेष करूं लागले. यानंतर जेम्स व पार्लमेंट यांच्यामध्येही खटका उडण्याची चिन्हें दिसूं लागलीं ! यावेळीं पार्लमेंट व राजा यांच्यामध्ये अधिकारविभागणी कशा प्रकारची असावी यावद्दल सर्वमान्य अशी लेखी घटना अस्तित्वांत नसल्यानें, राजा व पार्लमेंट यांच्यामध्यें वितुष्ट येण्याचे प्रसंग बरेच येत ! परंतु राजा कर्तृत्ववान् व धारेणी असला म्हणजे तो आपल्या मुत्सद्देगिरीनें असे प्रसंग टाळून आपला कार्यभाग-