पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युरोपचा अर्वाचीन इतिहास. प्रकरण १ लें. विषय-प्रवेश. इतिहासाचे सामान्यतः प्राचीनयुग, मध्ययुग व अर्वाचीनयुग असे तीन विभाग करण्याचा प्रघात आहे. वास्तविक पहातां इतिहासाचें संक्रमण एकसारखें चाललें असून त्यांतील प्रत्येक भाग मागील व पुढील भागांशीं संलग्न असल्यामुळे इतिहासाचे वरील दृष्टीनें खंडशः विभाग करणें अप्रस्तुतच दिसेल ! परंतु इतिहासाच्या संक्रमणांत जरी खंड नसला, तरी निरनिराळ्या काळीं निरनिराळे प्रश्न प्रामुख्यानें पुढें येत असल्यानें केवळ विषयविवेचनाच्या सोयीसाठींच इतिहासाचे विभाग व पोटविभाग करावे - लागतात हें लक्षांत ठेवणें जरूर आहे. युरोपच्या इतिहासाचे प्राचीनयुग, मध्ययुग व अर्वाचीनयुग असे तीन विभाग इतिहासकारांनी कल्पिलेले आहेत. इसवी सनाच्या चवथ्या शतकांत प्राचीन रोमन साम्राज्यावर उत्तरेकडील गॉथ्स, व्हँ डाल्स, हन्स वगैरे रानटी टोळ्यांनी हल्ला करून रोमन पादशाही उध्वस्त करून टाकिली, व - रोमन साम्राज्यांत मोडणाऱ्या प्रदेशांत आपापल्या वसाहती स्थापन केल्या. या वेळीं रानटी टोळ्यांच्या आगमनानें पूर्वीची रोमन संस्कृति, रोमन आचारविचार, रोमन कलाकौशल्य, या सर्वांस निराळेंच वळण लागल्याचें स्पष्ट दिसूं लागल्यामुळे या कालास मध्ययुगाचा प्रारंभकाल असें समजण्यांत येतें. या मध्ययुगाचा शेवट केव्हां झाला व अवीचीनयुग केव्हां सुरू झालें हें नक्की सांगतां येणें कठीण आहे ! परंतु मध्ययुग व अर्वा - चीनयुग यांच्या कालमर्यादा. १३५० ते १५५० च्या दरम्यान युरोपमध्ये ग्रीक व रोमन लोकांच्या