पान:युगान्त (Yugant).pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युगान्त / २१५ मिळाल्यावर राजसूय होई. हे मोठेपण मिळवण्यासाठी शौर्य लागे, तसेच दातृत्वही लागे. राजे-रजवाड्यांना पाहुणचारासाठी बोलावून त्यांचा योग्य सत्कार करावा लागे. हजारो ब्राह्मणांना व इतरांना दक्षिणा द्यावी लागे. अशा त-हेने पहिलेपणाचा मान मिळवण्याची धडपड इतरही मानव सामाजात दिसते व त्यासाठी राजसूयासारखे सामाजिक संकेतही रूढ झालेले दिसतात ! 'अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति' ही नुसती कविकल्पनाच नाही. अशा त-हेचे अकिंचनत्व हा एक मोठा सामाजिक दर्जा होता. ही कल्पना सर्व मानवसमाजांत रूढ आहे. श्रीहर्ष दर सहा वर्षांनी सर्वस्वाचे दान करी, असे वर्णन आहे." एका कुळात, राजसूययज्ञ एका पिढीत एकदाच होई, म्हणून दुर्योधनाला तो करता आला नाही. असेच अश्वमेधाचे होते. यादवांमध्ये वसुदेवाने अश्वमेध केला. कुरुकुलात धर्माने केला. 'बरोबरीच्यांत पहिला' हे सूत्र ह्या संबंधाचे द्योतक आहे. महाभारतीय युगानंतर उत्तर भारतात मोठमोठी साम्राज्ये स्थापली गेली. बुद्धाच्या वेळी 'पसेनदी कोसल' नावाचा सम्राट होता. नंतर मगधातच एकामागून एक प्रथम मौर्यांचे, नंतर गुप्तांचे अशी साम्राज्ये झाली. ह्या सम्राटपदात या सम्राटाचे इतरांवर बिनतोड वर्चस्व होते. बरोबरीच्यांत पहिला हा नियम अगदी मध्ययुगापर्यंत होता. जर्मनीमध्ये बिस्मार्कपर्यंत अस्तित्वात असलेली लहान-लहान राज्ये ह्या धर्तीवरचीच होती. जरी भारतात साम्राज्यांमागून साम्राज्ये होत राहिली, तरी कित्येक लहान-लहान जातिसमूहांतून वर दिलेला नियम व त्याबरोबर आढळणारी मूल्ये व विचारसरणी दिसून येते. रजपुतांच्या निरनिराळ्या घराण्यांचे परस्पर नाते काहीसे असेच होते, मराठ्यां-चेही असेच होते. शिवाजीला औरंगजेबासारख्या परकीयांशी लढणे जितके जड होते, त्याहीपेक्षा बरोबरीच्या स्वकीय मराठा- कुळाकडून राजा-सर्वांचा मुख्य- म्हणवून घेणे जड गेले. जुनी घडण 'अमेरिकन इंडियन लोकांत “पोटलॅच" म्हणून अशाच त-हेचे एक कार्य असते.