पान:युगान्त (Yugant).pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १९१


लोळू दिले, त्यांच्या अंगावरून हात फिरविला. हे सर्व शांतपणे,न घाबरता चालले होते. घोडे ताजेतवाने झाले. अर्जुनाने आपल्या बाणवर्षावाने सर्वांना थोपवून धरले होते. त्याने रथावर परत उडी घातली व रथ चालू लागला. घोडे, सारथी व रथी सर्वच एकमेकांचे हृदय जाणणारे होते.
 इकडे धर्मराजाचा जीव थोडथोडा होत होता. त्याने दारुकाच्या रथातून शैनेय सात्यकीला अर्जुनाकडे पाठवले. भीमही थोड्या वेळाने आला, व अर्जुनाच्या प्रवासाला गती मिळाली. शेवटी तो जयद्रथाजवळ पोहोचला. जयद्रथाचा रथ व पताका त्याने मोडून टाकली, व शेवटी जयद्रथाचे शीर उडवले. दोघा मित्रांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
 एका दिव्यातून अर्जुन पार पडला होता. पण अजून त्याला सांभाळायचे होते. त्या दिवशी दोन्ही बाजूंना इतका त्वेष चढला होता की, पलिते लावून रात्री लढाई पुढे चालू झाली. योद्ध्यांना मध्ये थोडी विश्रांती मिळाली. सूर्य उगवल्यावर परत युद्धाला तोंड लागले. ह्या रात्रीच्या युद्धात कृष्णाने घटोत्कचाला इरेला घातले. शेवटी त्याच्यापुढे ठिकाव लागेना, तेव्हा दुर्योधनाच्या विनंतीवरून कर्णाने अमोघ अशी वासवी शक्ती त्यावर सोडली व घटोत्कच मेला. घटोत्कचाच्या मृत्यूमुळे पांडव दुःखात बुडाले, तर कृष्ण आनंदाने नाचतच सुटला. शेवटी अर्जुनाला कृष्णाला दाबणे भाग पडले. “अरे, एवढा वीर पडला, तर तू आनंदाने नाचतोस का?" ठेवीत होता, ती जपून मारण्यासाठी 'बाबा रे, कर्ण जी शक्ती तुला फुकट गेली म्हणून.” कृष्णाने उत्तर दिले. इकडे धर्म संतापला होता. " अभिमन्यू मेला, तेव्हा अर्जुन नव्हता. अर्जुन असताना घटोत्कचासारखा गुणी मुलगा मारला गेला. किती त्याने आमची सेवा केली होती. त्याच्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही. मुख्य शत्रूंना मारायचे सोडून त्या क्षुद्र जयद्रथापायी एक दिवस फुकट गेला. आता मीच जातो द्रोणाला व कर्णाला मारायला." असे म्हणून