पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही




बाबा : पोचला नाही का अजून घरी पोरगा. कुठे गेला असंल? मी आलोच गं वरच्या गल्लीत बघून. शाळेतून येतो जरा.

अक्ष्या : काका, संज्याचं दप्तर बघा हे. तो कुठं गेला ते कळलंच नाही. मी थांबलोय शाळेत मुद्दाम. तो परत आला तर म्हणून. बाबा : सांगून नाही गेला का तुला? अक्ष्या : नाही काका, पण आज गणिताचे मार्क कळल्यापासून गप्प झाला व्हता पार. म्हणत होता ‘बाबांनी सांगितलंय घरी यायचं नाही नापास झालास तर....' बाबा : अरे बापरे ! नाना येतात.