Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आत्वूड साहेबाचें यंत्र.

५१

या वजनास कडी जवळ येईपर्यंत मात्र चलन देत्ये, त्यानंतर पूर्वीचा मिळालेल्या वेगानें त्यापुढे त्याचें चलन होतें.

 या यंत्राचा सहायानें जा कृति करून पाहिल्या आहेत, त्यांजवरून असे स्थापिलें आहे कीं पतन पाव- णाऱ्या पदार्थाचा काळाचे बरोबर भाग केले, जर से- कंद केले, तर प्रत्येक निरनिराळ्या सेकंदांत जा स्थ- ळांतून पदार्थाचें पतन घडेल तीं स्थळे १,३,५,७,९, इत्यादि विषम अंकांप्रमाणे होतील. हें स्पष्ट होण्या- साठीं मनांत आण कीं, एका पदार्थास पडण्यास १,२,३ आणि ४ सेकंद काळ लागला, तर या सेकं- दांत ह्मणजे काळांत जा स्थळांतून पतन घडलें तीं स्थळें त्या अंकांचा वर्गांबरोबर आहेत, ह्मणजे १,४,९, आणि १६ यांबरोबर आहेत; कारण १ हा एकाचा वर्ग आहे, ४ हा २ होंचा वर्ग आहे, ९ हा तिहींचा वर्ग आहे, आणि याप्रमाणे पुढेही. आतां जर दुसऱ्या सेकंदांत किती स्थळांतून पतन घडले तें काढायाचे असेल तर, एक सेकंदाचें १ स्थळ, दोन सेकंदांचा ४ स्थळांतून वजा करावें ह्मणजे बाकी ३ हैं इच्छिलें अंतर होईल; तिसन्यांतील अंतर काढणे असल्यास, ९ यांतून ४ वजा करावे, ह्मणजे बाकी ५ हैं अंतर होईल; चवथ्यांतील काढणे असल्यास, १६ यांतून वजा करावे ह्मणजे बाकी ७ हैं अंतर होईल; आणि याप्रमाणे पुढेही. यावरून पहिल्या सेकंदांत पदार्थ कांहीं अंतरां- तून पडतो, दुसऱ्या सेकंदांत त्याचा तिप्पट अंतरांतून