Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वजन - पतन पावणारे पदार्थ.

४३

त्याचेच प्रेरणेनें केवळ वर तो जातो, कां कीं आपल्या आकार परिमाणा इतके हवेचे अंश खाली दाबल्यावांचून किंवा दूर केल्यावांचून त्याचाने वर चढ- वत नाहीं. -

 यावरून सर्व पदार्थ पृथ्वीवर पडतात; आणि वजन ह्मणून जें काय आहे त्याचें कारण तेंच आहे, यावरून बजन ह्मणजे पदार्थाचा पृथ्वीचा दिशेकडील भार; प्रत्येक पदार्थ दुसऱ्या पदार्थावर ठेविला असतां तो आ- पला भार त्यावर घालितो; जर हातावर दगड आहे, तर दगडाचा जो भार, हातावर आहे, त्यास दगडाचें वजन ह्मणतात; सर्व पदार्थ निराधार सोडिले असतां पृथ्वीवर पडतात, ह्मणून ते सर्व पदार्थ वजनानें युक्त ह्मणजे भारी आहेत.

 गुरुत्वाकर्षण सर्व पदार्थास पृथ्वीचा मध्याकडे ओ- ढितें, ह्मणून दोन पतन पावणारे पदार्थ परस्परांशी समांतर दिशेंत पडणार नाहीत; कां कीं जा दोन रेघा एका बिंदूशी मिळतात त्या समांतर होऊं शकत नाहींत; यामुळे जे सर्व पदार्थ गुरुत्व प्रेरणेचा स्वाधीन असतात, ते पदार्थ त्यांचा खालचा समपातळीवरल्या लंबापासून कांहींसे दूर पडतील. जर २४ व्ये आ कृतीप्रमाणें एक तराजू केली ती अशी क आकृति २४. जा गोलाचा मध्याकडे तिची पारडीं आक- र्षिलीं जातात, त्या गोलाशीं तो तराजू को- णत्याही प्रमाणांत असेल, आणि जा ठिका- णापासून तीं पारडीं टांगलीं आहेत तेथून