या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शब्दपरिभाषा.
२१३
परिणामरूप प्रेरणा
-
दोन अथवा अधिक प्रेरणांचा. संयोगाने झालेली जी प्रेरणा ती.
प्रतिबंध
-
जा कारणानें चलन पावलेल्या पदार्थाचें चलन कमी होतें, अथवा नाहींसें होतें, अथ- वा उलटें होतें त्यास प्रतिबंध ह्मणतात. पृ० ६.
प्रेरण
-
जा कारणानें स्थिर पदार्थाचा आंगीं चलन उत्पन्न होतें, अथवा चलन पावलेल्या पदार्थाचें चलन कमी होते किंवा फिरतें त्या कारणास प्रेरणा ह्मणावें. पृ० ६.
प्रेरणा पृथक्करण, प्रेरणैकीकरण
-
दोन किंवा अ- धिक प्रेरणांपासून झालेल्या एका प्रेरणेचा जागी त्या प्रेरणांची योजना करितात, त्या कृतीस प्रेरणापृथक्करण ह्मणतात. आणि याचे उलट्ये कृतीस प्रेरणकीकरण ह्मणतात.
मध्याकर्ष प्रेरणा
-
जी प्रेरणा पदार्थास एका बिंदू भोंवतीं फिरवित्ये ती. पृ० १०.
मध्योत्सारिणी प्रेरणा
-
जी प्रेरणा मध्याभोवती फिर णाऱ्या पदार्थास मध्यापासून दूर नेये ती.
मोमेंट
-
एक शक्ति पदार्थास एका बिंदूभोवती जा स्थळांतून फिरवित्ये, त्या स्थळास त्या शक्तीनें गुणिलें असतां त्या गुणाकारास बिंदूभोंवतीं त्या शक्तीचा मोमेंट ह्मणतात. पृ० १२१.
लंब
-
जी रेघ दुसऱ्या रेघेवर पटून जवळ जवळचे कोन बरोबर करिये तीस लंब ह्मणतात.
वेग
-
पदार्थाचे चलनाचे त्वरेचे परिमाणास वेग ह्मणतात.