Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मळसूत्र.

१९१

परिघ, आणि त्या मळसूत्राचा सूत्रांमधील अंतर. मळसूत्रा- चा एका फेऱ्यापासून दुसऱ्या फेऱ्यापर्यंत वजन अथवा प्रति बंध जाण्याचा पूर्वी, मळसूत्राचा दांडा एक वेळ फिर- विला पाहिजे हैं उघड आहे; ह्मणून मळसूत्र फिरवि- णारा दांडा फिरविण्यानें जें वर्तुळ होतें, त्याचा परिघ, मळसूत्राचा सूत्रांतील अंतरापेक्षां जितका मोठा असेल, तितकी मळसूत्राची शक्ति अधिक होईल.

 यावरून असें दिसतें कीं फिरविण्याचा दांडा जि- तका लांब असेल आणि मळसूत्राची सूत्रे जितकीं अति जवळ असतील, तितकी त्या मळसूत्राची शक्ति अधि- क होईल; ह्मणून या यंत्राचे यांत्रिक सामर्थ्य वाढवि प्यासाठीं, जा उच्चालकानें शक्ति लागू होत्ये त्याची लांबी वाढवावी, अथवा सूत्रांमधील अंतर कमी करावें. उदाहरण, सारख्या परिघाचा दांड्याची दोन मळ- सूत्रे आहेत, त्यांत जर एकाचे सूत्रांमधील अंतर १ इंच आणि दुसऱ्याचे सूत्रांमधील अंतर ३ इंच असेल तर, उतरणीचा मूळ कारणाचा विचार केल्यानें असें दिसेल, कीं जा मळसूत्राचा सूत्राचें अंतर ३ इंच आहे, त्यापेक्षां जाचे सूत्राचें अंतर १ इंच आहे, त्या- पासून तिप्पट नफा होईल. जर दोन उतरणीची उंची सारिखीच आहे, परंतु त्यांतून एका उतरणीचा पायाचा तिप्पट दुसरीचा पाया आहे, तर लांब पा- याचा उतरणीपासून जो यांत्रिक नफा होईल, तो दु- सरीचा नफ्याचा तिप्पट होईल. परंतु त्या उतर- णीचा उंचीवर पोचण्यास तितका काळ अधिक ला-