१५५
चा दोन टोकांस बांधून,
ती दोरी कप्पीवरून सोड- ली असतां तीं वजनें सम-
भाकृति १०४.
तोल राहातील; कारण जर
कोणतेंहि एक वजन कांहीं स्थळांतून खाली ओढले, तर त्याच काळांत दुसरें वजन तितक्याच स्थळांतून वर
चढेल, आणि दोरी सर्वत्र सारखीच तागेल; आणि त्या दोघांचे वेग सारखेच आहेत, त्यावरून तीं पर- स्परांस तोलून धरितील. यावरून असें दिसतें कीं अचर कप्पीपासून कांहींच यांत्रिकस्वार्थ होत नाहीं ; तथापि तिचा योगानें प्रेरणेचा योजनेची दिशा फिर- वितां येत्ये, हा एक मोठा स्वार्थ होतो; कारण एक मनुष्य आपले स्थान न बदलतां या कप्पीचा योगानें, कांहीं वजन पाहिजे तितक्या उंच स्थळीं चढवील, परंतु ती कप्पी नसली तर त्यास वजनाबरोवर वर चढावे लागेल; दोरीचा योगानें वजनावर कित्येक मनुष्यांची शक्ति लागू करण्यास हे यंत्र उपयोगी पडते. कधीं कधीं दोन अचर कप्प्या कामांत आणाव्या लागतात आणि अशा पक्षीं घोड्याचा सामर्थ्यरूप प्रेर- णेची योजना करितात, आणि बहुतकरून क्याप्स्तना- नेही शक्तीची योजना करितात. उदाहरण, मनांत आण कीं एक मोठें अ वजन उचलायाचे आहे (आ- कृति १०५), तर ब आणि क अशा दोन अचर