Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

७५ केल्यानंतर, प्रत्येक अ पत्रा जो मागें पडावयाचा ( सरावयाचा ) तो त्या | कांबीच्या वाढत्या आकारामुळे मागें न सरतां तसाच तेथें राहतो. म्हणजे अहे पत्रे तसेच त्या ठिकाणीं एकमेकापासून सारख्या अंतरावर रहातात. व या योगानें त्या प्रेसमध्ये म्हणजे अपश्नावर प्याराफीनच्या पिशव्या पुनः ठेवण्याचें काम फार सुलभ व कमी अडचणीचें होतें.
ह्या प्रेसचा तळ ओतीव लोखंडाचा असून टोपल्यासारखा खोल असतो. त्या लोखंडी टोपल्यांत अ पत्र्यावरील पिशव्यांतून निघालेला पातळ द्रव जमतो, सिलींडरच्या वरच्या भागावर व उभ्या खांबांच्या तळच्या भागावर गळपट्यासारखें लोखंडाचे पट्टे असतात.ह्या प यांच्या आंत व अ पत्र्याच्या बारे पण दोन अ पत्र्यांच्या मधील जागेत लहान लोखंडी अर्ध्या नळ्या (वन्याळासारख्या) बसविलेल्या असतात. त्या योगें प्याराफीन दाबून जो पातळ पदार्थ निघतो तो त्या खांबावरून किंवा ब कांबीवरून खालीं न उतरतां ड या लोखंडी टोपलीत पडतो. आकृती नं. २ मध्यें दाखविलेल्या गोल खांबांच्या बाहेर ज्या दुहेरी रेघा दिसतात तेच हे पन्याळ किंवा अर्ध्या नळ्या आहेत. ह्या प्रेसवर घडीव लोखंडी पत्र्याचें वेष्टण असतें. व त्यास बिजागरें लावलेला दरवाजा पुढच्या बाजूस असतो. याच दरवाजांतून प्याराफीन भर-लेल्या पिशव्या त्या प्रेसमध्ये ठेवतात, व त्यांतून बाहेर काढतात.
 त्या प्रेसच्या डाव्या व वरच्या बाजूस क ही नळी लागू केलेली अ- सते. ती लोखंडी असून तीस भोंकें पाडलेलीं असतात. या नळीत वाफ सोडली असतां दाबल्या जाणारे पदार्थाचें उष्णमान वाढवितां येते. प्रेसच्या डाव्या वरच्या बाजूस पुढे आलेली तोटी दिसते तेथें ती क नळी सुरू होते व तेथून त्या प्रेसच्या खालीं व पाठीमागे नेऊन नंतर तेथून त्या लोखंडी टोपलीच्या तळाच्या सभोवार दोन्ही बाजूस वेष्टिलेली