Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१

हें मिश्रण पिशव्यांत घालून दाबावयाचें असतें. म्हणून त्याचे मोठाले तुकडे किंवा चापट मोठाले गोळे करावयाचे असल्यास प्याराफीनच्या दर १०० भागास ७५ भाग नेपथा त्या प्याराफीन मध्ये मिळविण्यास पुरा होतो. पण ढोलक्यावरून ओतून शिन्यासारखा पदार्थ तयार करणें असेल तर प्याराफीनच्या दर १०० भागास ९० भाग नेपथा त्यांत मिळवावा लागतो.

 दाबण्याकरितां प्याराफीनचे मोठाले तुकडे पाडणें किंवा शिन्यासा - रखा पदार्थ तयार करणें या कामास कमीजास्ती नेपथा लागतो. सबब सोईप्रमाणें करावें. नंतर प्याराफीनच्या त्या मोठाल्या वड्या किंवा शिरा जो असेल तो पदार्थ पिशव्यांत भरावा. त्या पिशव्या शोषक पदार्थांच्या केलेल्या असतात. बहुत करून नारळाच्या काथ्याच्या पिशव्या करून त्यांस आंतल्या आंगानें क्यानवासचें कापड लावलेलें असतें. त्या पिशव्यामध्यें तो पदार्थ भरून, दाबण्याकरितां हायड्रॉलिक प्रेसमध्यें त्या मांडाव्या. प्रथम लोखंडी पत्रा ठेवून त्यावर तेव्हढ्याच आकाराचा, बारीक गवताच्या चटईचा तुकडा ठेवावा. त्या चटईच्या तुकड्यावर, प्याराफीन भरलेली पिशवी ठेवून तीवर पुनः तशाच चटईचा तुकडा ठेवून नंतर त्या चटईच्या तुकड्यावर तसाच लोखंडी पत्रा ठेवावा. याप्रमाणें भरलेल्या सर्व पिशव्या ठेवाव्या. यायोगें त्या प्याराफीनचे थर निरनिराळे रा- हतात व त्यांतील तेल व पातळ पदार्थ बाहेर निघण्याची सोय होते. नंतर पिशव्यांवर त्या प्रेसमध्यें दाब करावा. हें दाबण्याचे काम त्या प्यारा- फीनमधील सर्व पातळ तेल व तेलकट पदार्थ बाहेर निघून निराळे होईपर्यंत पुनः पुनः करावें लागतें. दाबलेल्या प्याराफीनचे तुकडे पार- दर्शक दिसूं लागेपर्यंत दाबण्याची क्रिया करावी लागते. पिशव्यांतील