Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

धातूची एक शंकाकार नळी समोर खोचून वांकडी तिकडी करून त्या स्केलमधून पार नेतात. यायोगें त्या पिपांतील प्याराफीन मिश्र होऊन नमुना त्या नळींतून काढून कांचेच्या बुचाच्या रुंद तोंडाच्या बाटल्यांत भरावा. जर त्या बाटल्यांस कांचेऐवजी लांकडी बुचें लावण्याचीं अस- तील तर तीं लांकडी बुचें अगोदर प्याराफीन मेणांत भिजवून ठेवावीं लागतात. असें न केलें तर बाष्पोद्गमनानें त्या बाटल्यांतील नमुन्यांपैकीं कांहीं भाग कमी होईल व त्या बाटल्यांच्या वरच्या भागी थोडासा ओलावा जमून राहील.
 प्याराफीन स्केलमध्यें मळ किंवा अविद्राव्य पदार्थ किती आहे तें तपासणें.- या दोन पदार्थात प्याराफीन दाबते वेळीं पिशव्यां- चे कार्पासतंतु त्यास चिकटून येतात व इतर धुळ वगैरे कचरा मिश्र होतो, इतक्यांचा समावेश होतो. या कामास नमुना सुमारें १ शेर (पौंड ) ध्यावा लागतो. नमुना वजन करून मंदोष्णतेवर पातळ क- रावा व नंतर स्थीर ठेवून त्यांतील मळ तळी बसला ह्मणजे वरचा भाग हळूच काढून घ्यावा. खालीं राहिलेल्या कचऱ्याच्या भागांत या- राफीन शिवायचें ग्यासतेल ( Gasolene ) मिळवून तें मिश्रण भोर्के असणाऱ्या गाळण्याच्या यंत्रांतून गाळावें. ह्मणजे वर कचरा वगैरे मळ राहतो. या प्रमाणें पुनः एकवार त्यांत ग्यासतेल मिळवून गाळून राहिलेला कचरा काढून सुकवून वजन करावा. हाच त्या ध्या- राफीन स्केलमधील अविद्राव्य पदार्थ होय. जें वजन होईल त्यास ७०* नीं भागावें ह्मणजे प्याराफीन स्केलच्या दर १०० भागांत किती अ- विद्राव्य पदार्थ आहे तें समजतें.


 * ७००० हजार ग्रेन ह्मणजे एक पौंड होतो सबब ७० या आकड्यानें भागले तर १०० प्रेन मधील प्रमाण सांपडतें.