ह्मणजे हायड्रालीक प्रेसमध्ये घट्ट गोळा रहातो त्यास हार्ड स्केल (प्यारा- फीनचें) ह्मणतात. व खाली (हायड्रालीक प्रेसच्या बाहेर) जें पातळ तेल निवतें तें व प्रथम निघालेले पातळ तेल एकत्र करून त्यांस पुनः शेंकडा २ भाग प्रमाणे सलफ्युरीक आसिडानें व नंतर शेकडा १ ॥ भाग प्रमाणानें तीव्र सोडा द्रवानें धुवून नलिकायंत्रानें खेचून काढतात हें तेल १८° फा. अंशपर्यंत थंड करून गाळण्याच्या प्रेसमधून गाळून काढतात. नंतर गाळण्याच्या प्रेसवर राहिलेला घट्टसा गोळा हायड़ालीक प्रेसमध्ये दा- बून काढतात. दाबल्यानंतर हाय प्रेसमध्ये राहिलेला घट्ट गोळा काढून घेतात. यासच साफ्ट स्केल ( प्याराफीन चें) ह्मणतात. सारांश खनिज कोळसा दोन वेळ गाळून अर्करूपानें तेल काढतात. तें तेल सल्फ्युरीक आसीड व सोड्याने धुऊन थंड करून गाळण्याच्या प्रेस- मधून गाळतात. प्रथमचा घट्ट गोळा हायड्रॉलिक प्रेसमध्ये दाबून जो अगदी घट्ट गोळा निघतो त्यास फ्याराफीनचें हार्ड स्केल ह्मणतात. नंतर राहिलेलें व निघालेलीं तेलें एकत्र करून पुन: सलफ्युरीक आसिडानें व सोड्याने धुऊन थंड करून गाळतात; जो गोळा गाळ- ण्याच्या प्रेसवर रहातो. त्यास हाय० प्रेसमध्ये पुनः दाबून काढतात. यायोगें जो खळीसारखा गोळा निघतो, त्यास प्याराफीनचें साफ्ट स्केल ह्मणतात. हार्ड स्केल ह्मणजे कठिण रवा व साफ्ट स्केल ह्मणजे नरम रवा अशीं फ्याराफीनचीं नांवें आहेत. कठिण प्यारा- राफीन मेणासारखें व नरम प्याराफीन तुपासारखें लालसर असतें. याप्रमाणें प्याराफीन दोन जातींचे तयार करण्याची रीत आहे.
असें तयार केलेलें प्याराफीन बाजारांत पुष्कळ मिळतें.पण त्यांत अशुद्ध पदार्थ, थोडेसे पातळ तेल व पाणी वगैरे असल्यामुळे तें प्याराफीन मेणबत्त्या करण्याच्या उपयोगी पडत नाहीं. सबब त्यास
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/८६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२